संजीव बडोले, प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२९ नोव्हेंबर:-
येथील रहिवासी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी,ता.-लाखांदूर जि-भंडारा येथे कार्यरत प्रयोगशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शिक्षक दिनानिमित्त २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याअनुषंगाने नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे अधिकारी लेखानंद कदम आणि संतोष डाऊ यांनी पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे भेट देऊन त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी सुनील कापगते उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,दुर्गेश कुडेगावे,भालचंद्र चुटे मुख्याध्यापक, अनुराधा रंगारी,गौतम कांबळे,शिल्पा मेश्राम,
चंपा बागडे,शेवंता शहारे आणि शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
या सत्काराबद्दल खुशाल डोंगरवार यांनी नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे आभार मानले आणि विद्यार्थी विकासासाठी असेच कार्य करत राहीन अशी ग्वाही दिली.
Navnit education limited kdun khushal dongrwar yancha satkar
Discussion about this post