चंद्रपूर : वरोरा भद्रावती मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी करोडो रुपयाचा निधी खेचून आणला आहे. या विकास कामांमध्ये रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम, वाढीव पाणी पुरवठा योजना, सिमेंट कॉकीट रस्ता बांधकाम इत्यादींचा समावेश आहे. भद्रावती तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा दौरा कार्यकम दि. 22- 23, 24 नोव्हेंबर 2023 गुरुवार ला पार पडला. यावेळी आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते भुमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. प्रतिभाताई धानोरकर यांचा दौरा विक्रमी म्हणून ओळखला जात आहे. कारण, एका दौर्यात विकास कामाचे भुमीपूजन आणि लोकार्पण करणे ही एक मोठी उपलब्धी आहे. या दौर्यामुळे भद्रावती तालुक्यातील विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मानोरा ते धानोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण, किन्हाळा, आष्टा, घोसरी, टेकाडी, काटवल तु., विलोडा, काटवल न., चोरा, आष्टी का., मासळ व चिंचाळा येथे विविध विकास कामांची पाहणी केली व लोकार्पण केले.
या दौऱ्यात त्यांनी मानोरा ते धानोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीची सोय सुलभ झाली आहे. त्यांनी किन्हाळा, आष्टा व घोसरी येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याबद्दलही समाधान व्यक्त केले. या योजनेमुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
तेकडी, काटवल तु., विलोडा, काटवल न., चोरा, आष्टी का., मासळ व चिंचाळा येथे सिमेंट कॉकीट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील वाहतुकीची सोय सुलभ झाली आहे. त्यांनी या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. भद्रावती तालुक्यातील विविध गावांमध्ये भुमीपूजन व लोकार्पण सोहळा दौरा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भद्रावती काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, संजय पोडे, भोजराज झाडे, पांडुरंग आगलावे, गुड्डू एकरे, वीरेंद्र वानखेडे, राकेश दोन्तावार, अशोक येरगुडे, सुधीर मुडेवार, राजू डोंगे, ईश्वर निखाडे, घनश्याम मत्ते, ज्योती मोरे, चंदू दानव, मंगेश मत्ते, प्रदीप घागी, अनिल चौधरी, प्रवीण बादुरकर, अजित फालके, सुमित मुळेवार, डॉ. दातारकर, ईश्वर धांडे, सलाम शेख, सरपंच वीरेंद्र वानखेडे, अनिल फलके, लेडांगे, नांदे, तुरांकर, नयन जांभुळे भोजराज जी झाडे, सुधीर मुडेवार, अनिल चौधरी, मंगेश मत्ते, ईश्वर पा. धांडे, भगवान काकडे, किशोर पडवे, नयन जांभुळे, चांगदेव रोडे, सलाम शेख, संजय उताणे, संजय काकडे, दिलीप चौधरी, प्रशांत झाडे, आकाश ढवस यांची उपस्थिती होती.
मी माझ्या 4 वर्षांच्या कार्यकाळात वरोरा – भद्रावती मतदारसंघातील विकासासाठी कटिबद्ध राहिली आहे. या काळात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. यापुढेही मी तालुक्यातील विकासासाठी सतत कार्यरत राहीन, असे प्रतिपादन वरोरा – भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले.
Discussion about this post