Which constituency for which party? Allotment of front seat for Lok Sabha
कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ? लोकसभेसाठी आघाडीचे जागा वाटप
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक उरलेल्या आहेत. पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत आणि तीन डिसेंबरला त्यांचा निकाल आहे. आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर निर्णय होईल. पण त्याआधी या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहेत. एकूण 48 जागा आहेत त्यापैकी दोन जागा या राखीव ठेवण्यात आले आहेत 48 जागा ही मोठी संख्या आहे उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही सगळ्यांचे लक्ष असेल. विशेषतः इंडिया आघाडी देशभरात विरोधी पक्षांची आघाडी आहे आणि महाराष्ट्रात या आघाडीला महाविकास आघाडीचे नाव आहे. 48 पैकी दोन जागा या राखीव यासाठी आहेत.
वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला ही राखीव ठेवण्यात आली आहे जर वंचित आघाडीशी बोलणी फिस्कटली शिवसेनेबरोबर त्यांची बोलणी तर ही जागा काँग्रेसला जाऊ शकते तसंच हातकणंगलेची जागा ही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे सर्व पक्षांनी मिळून पाठिंबा द्यावा अशी सध्याची भूमिका आहे. पण तसं न झाल्यास ही एनसीपी पवार गटाकडे जागा जाईल. 46 जागांचे गणित आहेत त्यात ज्या सहा मुंबईतल्या जागा आहेत. चार जागा या शिवसेना युपीटी लढवेल आणि दोन जागा ही काँग्रेस लढवेल.
मुंबईतल्या दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई काँग्रेसला कोणत्या जागा येऊ शकतात, तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे मुंबईतलं गणित झालं तसंच चार जागांवर अंतिम चर्चेतून निर्णय होईल. राष्ट्रवादीकडे बीड, जळगाव, रावेर, दिंडोरी, नगर, बारामती, माढा, सातारा, शिरूर, भिवंडी हि जागा राहील.
विदर्भामध्ये नागपूर ही काँग्रेसकडे जाईल. भंडारा-गोंदिया काँग्रेस आणि एनसीपी यांच्या चर्चेतून मार्ग निघेल. वर्धा काँग्रेसकडे आहे चंद्रपूर काँग्रेसकडे आहे. गडचिरोली काँग्रेसकडे, अमरावतीमध्ये काँग्रेस आणि एनसीपी यांच्या चर्चेतून मार्ग निघेल. यवतमाळ वाशिम ही जी जागा आहे ती शिवसेना, अकोला वंच ित बहुजन असे सूत्र राहू शकते.
अकोला आणि हातकणंगले या दोन जागा आहेत. त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत इथे वंचित बहुजन आल्यास अकोल्याची जागा ही वंचितला दिली जाईल आणि समजा वंचित बरोबर नाही आली तर ती जागा काँग्रेसकडे जाईल असं ठरवण्यात आले तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. राजू शेट्टी सोबत न आल्यास पवार गट ती जागा लढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post