सोसवेना हा विरह
अश्रू भरले डोळ्यात
भेट व्हावी लवकर
इच्छा एकच मनात
रात्र विशाल काळोखी
नसताना तू अंधार
विहाराचे क्षण आता
तुझा शोधते आधार
मज सोसवे न आता
नको असा हा दुरावा
तुच माझा प्राणसखा
देऊ कितीदा पुरावा
घेतो रोजच परिक्षा
किती करावी प्रतिक्षा
कधी संपेल विरह
मज नको ही शिक्षा
आस मज भेटण्याची
कधी येणार तो क्षण
बघताच डोळ्यापुढे
आनंदीत होई मन
भाव अंतरीचा जाण
दूर विरह हे व्हावे
मज भेटावया राया
पंख खगाचे लाभावे
*🔷हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post