Khabarbat Latest Bharti 2023 Current and Upcoming Jobs
नागपूर, 14 ऑक्टोबर 2023: विश्वमेघ विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय ता. मौदा, जि. नागपूर (अंशतः अनुदानित) आणि लक्ष्मी प्राथ. व माध्यमिक विद्यालय खरबी, नागपूर (का.वि.अ.) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदे
पद | शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता | पदसंख्या |
---|---|---|
सहाय्यक शिक्षक (इंग्रजी) | एम.ए. (इंग्रजी) बी.एड् द्वितीय श्रेणी | 01 |
सहाय्यक शिक्षक (शारीरिक शिक्षक) | एम.एस.सी. बी.एड्. भौतिक, रसायन, जिवशास्त्र, गणित, द्वितीय श्रेणी | 04 |
प्र.शा. सहाय्यक | बी.एस.सी / एम. एस. सी | 01 |
क. लिपीक | बी.ए./बी.कॉम / एम. एस. सी. आय. टी डिप्लोमा धारक | 01 |
सहाय्यक शिक्षक | बी.ए./बी.एस.सी. बी. एड् | 02 |
शाळेचे नाव | मुलाखताची तारीख | मुलाखताची वेळ | ठिकाण |
---|---|---|---|
विश्वमेघ विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय ता. मौदा, जि. नागपूर | 16 ऑक्टोबर 2023 | सकाळी 11.00 ते 4.00 | धर्मापूरी, ता. मौदा, जि. नागपूर |
लक्ष्मी प्राथ. व माध्यमिक विद्यालय खरबी, नागपूर | 15 ऑक्टोबर 2023 | सकाळी 11.00 ते 4.00 | खरबी, नागपूर |
या भरतीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज करावेत.
चांदा येथे आयुध निर्माणीत भरती; १७ रोजी मुलाखती
नागपूर, 10 ऑक्टोबर 2023: भारत सरकार संरक्षण मंत्रालय, आयुध संचालनालय (सीॲण्डएस) आयुध निर्माणी हॉस्पिटल, चांदा येथे दोन नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार, आयुध निर्माणी हॉस्पिटल चांदा येथे दि. १७/१०/२०२३ (मंगळवार) ला स. १०.०० वाजता प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहू शकतात.
- पदाचे नाव: नियुक्त वैद्यकीय अधिकारी (दोन)
- शैक्षणिक अर्हता: एमसीआय मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय, भारत येथून एमबीबीएस डिग्री.
- एमसीआयकडे नोंदणी (सेवानिवृत्त डॉक्टर्स ७० वर्ष वयापर्यंत नियुक्त करण्याकरिता विचाराधीन राहतील)
- पारिश्रमिक: रु. २५००/- प्रति दिवस
- कंत्राटाचा अवधी: ०६ (सहा) महिने
- सर्व दाखले आणि झेरॉक्स प्रतींचा एक संच आणि ०२ पासपोर्ट आकाराचे छायाचित्रासह दि. १७/१०/२०२३ (मंगळवार) ला स. १०.०० वाजता प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहू शकतात.
अधिक माहितीसाठी, आयुध निर्माणी हॉस्पिटल चांदाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. सविस्तर शर्ती व अटी इंटरनेट वेबसाइट www.ddpdoo.gov.in वर उपलब्ध आहेत. ड्यूटीवरून गैरहजर राहण्याचे बाबतीत, प्रमाणानुसार दैनिक वजावट प्रभावित होईल. मुलाखतीला उपस्थित राहण्याकरिता कोणताही टीए / डीए देण्यात येणार नाही.
advt https://khabarbat.in/wp-content/uploads/2023/10/khabarbat-ads-rojgar.jpg
————
आरोग्य विभागात १९ हजार ६९५ रिक्त पदे भरणार
मुंबई दिनांक ९: राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाउल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पाऊले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात १९ हजार ६९५ पदे रिक्त असून ती भरण्याची कार्यवाही टीसीएसमार्फत सुरु आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील हे पाहावे अशी सूचनाही त्यांनी केली. ३८ हजार १५१ पदे यापूर्वीच भरण्यात आली आहेत अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.
येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैदयकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याचे सांगतांनाच वर्ष २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
*जिल्हा रुग्णालये अद्ययावत करणार*
वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न झाल्याने १३ जिल्हा रुग्णालये बंद झाली आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १२ जिल्हा रुग्णालये हस्तांतरित करण्यात येणार आहेत हे लक्षात घेता २५ जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत आणि सर्व सुविधा असलेली जिल्हा रुग्णालये उभारण्याचे तसेच सध्या वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या समितीने पुढील १५ दिवसांत हा आराखडा तयार करावा असे ते म्हणाले. १४ जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयांना देखील पुरेसे बळकट करा असे त्यांनी निर्देश दिले. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत सुविधा असल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. प्राथमिक उपकेंद्र, उप जिल्हा रुग्णालये, सक्षम झाल्यास शहरातील शासकीय आरोग्य यंत्रणांवर तां येणार नाही असेही ते म्हणाले.
*आरोग्यावरील खर्च वाढवा*
राज्यात सार्वजनिक आरोग्यावरील खर्च वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक देखील आली पाहिजे. पंधराव्या वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च झालाच पाहिजे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील अपेक्षित खर्च देखील झाला पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. रुग्णवाहिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य संस्थांचे बांधकाम, वैद्यकीय उपकरणे आदींसाठी ८३३१ कोटी निधी पुरवणी मागणीसह मंजूर करण्यात येत असून १२६३ कोटी अतिरिक्त निधी देखील लागणार आहे. हुडको कडून १४१ आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी ३९४८ कोटी निधी मंजूर झाला असून तो देखील वेळेत खर्च झाला पाहिजे. आशियाई विकास बँकेकडून ५१७७ कोटींचे कर्ज नवीन आरोग्य संस्थांसाठी मिळणार आहे. केंद्र सरकार पाहिजे तेवढं निधी द्यायला तयार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण यांनी मिळालेला निधी जास्तीतजास्त खर्च ३१ मार्च पर्यंत करावा असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
*प्राधिकरणावर तातडीने अधिकारी नेमा*
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणावर तातडीने भारतीय प्रशासन सेवेतील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर ८ पदांवर अधिकारी नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय आवश्यक ४५ पदांची निर्मिती करण्यासाठी विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवावा असेही ते म्हणाले.
*पद भरतीला वेग द्या*
सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात १९ हजार ६९५ पदे रिक्त असून ती भरण्याची कार्यवाही टीसीएसमार्फत सुरु आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील हे पाहावे अशी सूचनाही त्यांनी केली. ३८ हजार १५१ पदे यापूर्वीच भरण्यात आली आहेत अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.
*अनुकंपाची पदे लगेच भरा*
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठीची अनुकंपा पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.
*आणखी नऊ परिमंडळ निर्माण करणार*
राज्यात आरोग्य विभागाची ८ सर्कल्स आहेत. वाढती लोकसंख्या आणि रुग्णांचा ताण लक्षात घेता आणखी नवी ९ परिमंडळ निर्माण करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
……………..
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगणघाट अंतर्गत 34 अप्रेंटिस पदांची भरती
हिंगणघाट, 9 ऑक्टोबर 2023: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगणघाट अंतर्गत विविध पदांच्या 34 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
---|---|---|
अप्रेंटीस (विजतंत्री) | 12वी पास (विज्ञान शाखा) | 15 |
अप्रेंटीस (तारतंत्री) | 12वी पास (कला शाखा) | 15 |
अप्रेंटीस (कोपा) | 12वी पास (कला शाखा) | 4 |
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.mahadiscom.in/ या वेबसाइटवर नोंदणी करावी. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावी.
निवड प्रक्रिया
अर्ज केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे निवड करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. https://www.mahadiscom.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 ऑक्टोबर 2023
——————————————————————
मध्य रेल्वेत 40 जागांसाठी भरती; हिंदी आणि मराठी बोलणाऱ्यांना प्राधान्य
नागपूर, 08 ऑक्टोबर 2023: मध्य रेल्वे नागपूर मंडळात परवानाधारक पोर्टर्सच्या 40 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि. 01.10.2023 रोजी 18 वर्षापेक्षा कमी नसावे. उमेदवाराला हिंदी आणि मराठी बोलता आले पाहिजे आणि स्थानिक क्षेत्र आणि परिसराची माहिती असणे आवश्यक आहे.
मेट्रोपार्कमध्ये विविध पदांसाठी भरती | Ensaara Metropark
अर्जदाराने हॉटेल्स / विमानतळ / बस स्टॅण्ड इत्यादीमध्ये पोर्टर म्हणून काम करण्याचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, वयाचा पुरावा आणि पूर्ववर्ती म्हणजेच रेल्वे कर्मचारी/माजी सैनिक किंवा परवानाधारक पोर्टर्स यांचे पाल्य, स्काउट्स आणि गाइड्स, इत्यादीचे पुरावे संलग्न करणे आवश्यक आहे.
अर्ज ऑफलाइन पद्धतीने वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
https://cr.indianrailways.gov.in/
- अर्ज करण्याची पद्धत
अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवावा.
अर्जावर स्पष्टपणे “परवानाधारक पोर्टर पदाच्या भरतीसाठी अर्ज” असे लिहावे.
अर्जावर उमेदवाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी तपशील अचूकपणे भरा.
अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
अर्जाची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
विशेष सूचना:
अर्जदाराने अर्जसोबत खालील कागदपत्रे संलग्न करणे आवश्यक आहे:
- जन्मदाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- कामाचा अनुभव प्रमाणपत्र
- चरित्र प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (आरक्षित वर्गांसाठी)
- अपूर्ण अर्ज, अयोग्य कागदपत्रे आणि अक्षरशुद्धता नसलेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय,
मध्य रेल्वे,
नागपूर ४४०००१.
Click for Ads https://khabarbat.in/wp-content/uploads/2023/10/Central-railway-Bharti-2023.jpg
————————————–
नोकरी महोत्सव । 60 कंपनीमार्फत १२ पासून भरती प्रक्रिया
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नोकरी महोत्सव 12 ऑक्टोबर भंडारा व 13 ऑक्टोबर गोंदिया येथे होत असून, अंदाजे 25000 मुलामुलींचा सहभाग असेल व विविध क्षेत्रातील 60 कंपनीच्या मार्फत भरती प्रक्रिया होणार आहे.
कंपन्यांचे ठिकाण:- नागपूर – अमरावती – औरंगाबाद – अहमदनगर – पुणे – नाशिक व मुंबई.
शैक्षणिक पात्रता:- 10/12वी, सर्व आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पदवीधर, नर्सिंग, ऍग्रीकल्चर.
पगार:- फ्रेशर साठी 12000 ते 50,000 पर्यंत.
(शिक्षण तशी नोकरी व अनुभव तसा पगार 25000 – 1,00,000)
मुलाखत पूर्व प्रशिक्षण:- दिनांक 02 ते 07 ऑक्टोबर.
मोफत रजिस्ट्रेशन साठी लिंक –
भंडारा
https://forms.gle/DKa5jo4uzvtiZsD87
गोंदिया | https://forms.gle/aaSTVbfPpfWiBnBH9
#jobopportunities #jobfair2023 #mpsunilmendhe #mpbhandaragondia #noukarimahotsav #NarendraModi #DevendraFadnavis
Narendra Modi PMO India Devendra Fadnavis BJP Maharashtra Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule BJP – Bhandara Gondia Bharatiya Janata Party (BJP) Dr.Parinay Fuke Rajkumar Badole
Discussion about this post