• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Monday, May 12, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Article By AI

Ganesh Festival | पुण्यातील गणेशोत्सव; हर्शोलासाचा महासागर

Khabarbat™ by Khabarbat™
September 27, 2023
in Article By AI, Maharashtra, Social
ganesh-chaturthi-2023

ganesh-chaturthi-2023

WhatsappFacebookTwitterQR Code

ढोल ताशांच्या नीनादात ,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आनंदी व उत्साही वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या ,लाडक्या बाप्पाचे आगमन नुकतेच झाले. साऱ्या पुणेकरांचा आनंद बाप्पाच्या आगमनाने द्विगुणित  झाला .हा दैदीप्यमान उत्सव ,चैतन्य घेऊन आला .त्यामुळे मंडळाचे कार्यकर्तेच नव्हे तर आबालवृद्धांन मध्ये हर्शोलासाची  लहर आली. नगारा आणि सनईच्या सुमधुर आवाजात मानाच्या पाच आणि प्रमुख गणपती मंडळाच्या मिरवणुकांनी शहर दुमदुमून निघाले ,गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरातील रस्त्यांवर माणसांचे थवेच्या थवेच दिसू लागले. त्यातही घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेची जनतेची तयारी, त्यानेही शहरातील बाजारपेठा गजबजवून केल्या होत्या. लक्ष्मी रोड, तुळशीबाग ,शिवाजीनगर ,नारायण पेठ सदाशिव पेठ आदी  पेठा तील उत्साहतर ओसंडूनच वाहत होता.

पुण्यातील लोकांकडे घरगुती गणपती हा बहुतेकांचा दीड दिवसांचा असतो, काही लोकांकडे पाच दिवसांचा सुद्धा असतो ,तर विविध सोसायटीमधील गणेशोत्सव पाच किंवा सात दिवस चालतो. कारण बहुतेक सर्वांनाच नंतर शहरातील गणपती बघायला जायचे असते .देखावे आणि विसर्जन मिरवणुकीचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा असतो.

वाचण्यासारखी बातमी

National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

Parents-Teachers Conclave Organized by Department of Basic Sciences and Humanities at TGPCET, Nagpur

थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

                  गेल्या काही वर्षात पुण्यात ढोल ताशे नगारे वाजविणारी खूप मंडळ स्थापन झाली, यात उच्चभृ घरातील माणसे व स्त्रियांचा सुद्धा सहभाग असतो ,एकेका ढोल मंडळात 40 ते 50 किंबहुना शंभर सुद्धा वादक असतात, त्यात रस्त्यावर ढोल वाजविण्याचा आनंद अप्रतीम असतो .या सोबत लेझीम मंडळ ही असतात, पांढरे कपडे, त्यावर भगव्या रंगाचे जॅकेट, किंवा दुपट्टा व फेटा असा त्यांचा परिवेश असतो. शहराच्या बाहेर असणाऱ्या अनेक सोसायट्या मध्येही स्वतंत्र ढोल ताशे मंडळ स्थापन झाली आहेत. गणेशोत्सवाच्या पूर्वी जवळपास महिनाभर ही मंडळे वादनाची तालीम करीत असतात.

                   प्रथम पूजेचा मान लाभलेल्या श्री गणरायाचे उत्साहात आणि जल्लोषात आगमन झाले. पुण्यातील मानाचा पहिला ,श्री कसबा गणपती , यंदा मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिराच्या सजावटीत विराजमान झाला .सकाळी आठ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला, प्रभात बँड पथकाचे उत्कृष्ट वादन ,संघर्ष श्रीराम आणि शौर्य ढोल ताशा पथकातील वादकांनी केलेल्या तालाच्या गजराने पुणेकरांना थी

रकायला लावले. प्रथा आणि परंपरेप्रमाणे श्री ची मूर्ती चांदीच्या पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली .बाप्पा मोरया चा जयघोष आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला. सकाळी अकरा वाजून 37 मिनिटांनी डॉक्टर आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते गणेश मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.

                    मानाचा दुसरा गणपती म्हणजे ,तांबडी जोगेश्वरी मंडळाचा होय. या मंडळाच्या मिरवणुकीला नारायण पेठ येथील केळकर रस्त्यावरून प्रारंभ झाला. आढाव बंधूचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रॉस बँड चे स्वर ,शिवमुद्रा व ताल ढोल ताशा पथकाच्या वादनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. सज्जनगड येथील श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज भूषण महारुद्र स्वामी महाराज यांच्या हस्ते सकाळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

                    ३०० वर्षांनी यंदा गणेशोत्सव काळात या राशीच्या लोकांना ही ठरणार आनंदाची बातमी

मानाचा तिसरा ,श्री गुरुजी तालीम मंडळाचा गणपती ,याही  मिरवणुकीला सकाळीच प्रारंभ झाला. फुलांच्या आकर्षक रथात विराजमान झालेल्या गणपती समोर नगारा वादन गंधर्व ब्रास बँड गुरुजी प्रतिष्ठान ,अभेद्य शिवप्रताप ढोल ताशा पथकाच्या वादनाने मिरवणुकीत चैतन्य निर्माण केले .भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे  उत्सव प्रमुख पुनित बालन यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाचा, मूर्तीची तुळशीबागेतील श्रीराम मंदिरापासून पालखीतून मिरवणूक काढण्यात आली .बाबू गेनू चौक, मंडई, शनिपार ,बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आदी रस्त्यांवरून महागणपतीचे आगमन झाले .मंगेश बँड ,लोणकर बंधूंचे नगारा वादन समर्थ प्रतिष्ठानचा ढोल ताशा यांचा समावेश होता.

मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा  गणेशोत्सव मंडळाचा गणपतीची प्रतिष्ठापना टिळक पंचांगानुसार झाली आहे, त्यामुळे गणेश मंडळांने स्वतंत्र मिरवणूक काढली नाही ,परंतु गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

                 या पाच गणपतीच्या व्यतिरिक्त हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे जंगी  मिरवणुकीने स्वागत झाले  प्रसिद्ध तबलावादक पंडित विजय घाटे यांच्या हस्ते भव्य ओंकार महालात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृती मध्ये विराजमान झाला, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

                   तसेच फुलांनी सजविलेल्या ओंकार रथातून पारंपरिक पद्धतीने अखिल मंडई मंडळातील गजाननाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली.  ही तीन पुण्यातील ,वरील पाच व्यतिरिक्त मोठी मंडळे होय. अगदी दहाही दिवस या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची प्रचंड अशी रीग लागली असते. तसे पाहता लहान-मोठे असंख्य मंडळ पुण्यात आहेत .सर्वांचा उत्साह वाखागण्यासारखा असतो, त्याच दरम्यान पुणे फेस्टिवलचेही आयोजन करण्यात येते. यात भारतातील सुप्रसिद्ध कलावंत आपल्या कलेसह हजेरी लावत असतात. गेल्या काही वर्षापासून हेमामालिनी यांच्या नृत्याने पुणे फेस्टिवलचा शुभारंभ होतो .या दहा दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्यात रक्तदान शिबिर, शारीरिक तपासणी शिबिर , मनोरंजनाचे  विविध कार्यक्रम ,ज्ञानावर्धक ,कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते.अगदी दहा दिवस पुणेकरांना खूप मोठी पर्वणीच असते ,असे म्हणावयास हरकत नाही.

      मानाचे गणपती म्हणजे काय

     1893 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली गेली होती .आणि स्वातंत्र्यानंतरही या सणांचा उत्साह व चैतन्य मात्र कायम राहिले ,यामध्ये काळानुरूप काही बदल झाले पण अनेक वर्ष उलटल्यानंतरही मानाच्या पाच गणपतीची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते.

                          १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्या नंतर गणपती मंडळाची संख्या वाढत गेली .असं सांगितलं जाते की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या 100 वर गेली होती.  त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रूपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरू झाली. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत मानलं जातं .कसबा गणपतीचे मंदिर हे शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला मानाचा पहिला गणपती हा मान देण्यात आला. या मंडळाच्या गणपतीला विसर्जनाचा पहिला मान देण्याचं लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं ,म्हणून मग आजही कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीत पहिला असतो.

                  त्यानंतर मानाच्या दुसऱ्या गणपतीचं स्थान. ही पुण्याची  ग्रामदेवी मानल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीला मिळाला. हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीला मानाचा तिसरा म्हणून तर तुळशीबाग मंडळाच्या गणपतीला मानाच चौथ स्थान दिल्या गेलं. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी स्वतः स्थापन केलेल्या केसरी वाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती मानला जातो.

                    दरवर्षीप्रमाणे काही वर्षी खूप उत्साह ,चैतन्य, भाविकांमध्ये व मंडळांमधील कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा गणेश मंडळांना भेटी दिल्या, त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री श्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन ,सुप्रिया सुळे, राज ठाकरे ,सुनील तटकरे ,रोहित पवार आदींचा समावेश आहे.

गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला ‘असा’ निर्णय | Muslim Eid-e-Milad

                       पुण्यातील गणेशोत्सवा दरम्यान सर्वच मंडळांनी भव्य देखावे उभारले आहेत .श्रीराम मंदिराची प्रतिकृती !केदारेश्वर मंदिराची प्रतिकृती! तर अमरनाथ ची गुफा! शिवाजींची  प्रतिकृती! चंद्रयान! शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती! यावर विशेष भर असून, स्वयंचलित देखावे निर्माण करण्यावर मंडळांचा भर  दिसून आला .गजानन महाराजांचे शेगावचे मंदिर सुद्धा अगदी हुबेहूब येथे उभारण्यात आले आहे.

                आता सर्वत्र विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुक ही जवळपास 15 ते 16 तास चालते ती शांततापूर्ण व शिस्तीने व्हावी याकरिता स्थानीय प्रशासन व पोलीस प्रयत्न करत आहेत ,तर या मिरवणुकीत चैतन्य उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत, ही मिरवणूक पाहायला पुणे व परिसरातील लोक लाखोंच्या संगतीने येतात. व गणपती बाप्पाला निरोप देतात. ढोल ,ताशे, नगारे ,भजनी मंडळ, लेझीम पथक ,तालीम मंडळ यांचा मिरवणुकीत मोठा सहभाग असतो. त्याच सोबत जिवंत देखावे व स्वयंचलित देखावे ही सहभागी केल्या जातात .या गणेशोत्सवामुळे अगदी दहा दिवस पुणेकरांचे चैतन्याने व उत्साहाने भारलेले  असतात ,हा उत्साह त्यांचा नंतर वर्षभर कायम टिकतो.

– सुनील देशपांडे

ज्येष्ठ पत्रकार चंद्रपूर /पुणे

 ganesh visarjan 2023 date and time

ganesh chaturthi 2023 visarjan date and time

ganesh visarjan muhurat 2023
ganesh chaturthi 2023 start and end date
pitru paksha 2023 start date and time

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur
Ganesh Chaturthi 2023 । गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?
चंद्रपुरात १९ ऑक्टोंबरला सुरु होणार पाच दिवसीय महाकाली महोत्सव
Shri Ganesh Visarjan Chandrapur city | चंद्रपूर शहरात श्री गणेश विसर्जन तयारी पूर्ण; या चॅनेलवरून पहा लाईव्ह
Post Views: 395
SendShareTweetScan
Previous Post

Google’s 25th birthday | या सेवा नक्की वापरा; तुम्हच्या कामात घडतील हे बदल

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेवरील “ही” कविता तुफान वायरल

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

April 11, 2025
0
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

April 10, 2025
0
TGPCET, Nagpur Successfully Hosts National Level Technical Event TECHTANTRA 2K25

TGPCET, Nagpur Successfully Hosts National Level Technical Event TECHTANTRA 2K25

April 9, 2025
0
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (PRCI) चा २१व्या स्थापना दिवस

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (PRCI) चा २१व्या स्थापना दिवस

April 6, 2025
0
Load More
Next Post
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेवरील “ही” कविता तुफान वायरल

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेवरील "ही" कविता तुफान वायरल

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025
टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

May 6, 2025
सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

May 1, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025
टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

May 6, 2025
सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

May 1, 2025
National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

April 27, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

Click to see detail of visits and stats for this site

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा