मुंबईत पावसामुळे हाहाकार
आमदार अडकले ट्रेनमध्ये; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
राज्यभरासह मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रविवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबई तुंबली असून त्यामुळे मुंबईचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत अवघ्या ६ तासांमध्ये तब्बल 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने मुंबईची लाईफलाइन असलेली लोकलही विस्कळीत झाली आहे. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका बसला आहे. अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकले. त्यामुळे ते विधिमंडळ कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. कोरम पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे विधानसभेचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. आ. संजय गायकवाड, आ. अमोल मिटकरी, आ. जोगेंद्र कवाडे, अनिल पाटील आणि इतर सात आमदार हावडा मेलमध्ये अडकले होते. दरम्यान या पावसाच्या पाण्याने शाळांनाही विळखा घातला असून शहरातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले.
————
पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रन
अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना उडवलं
शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना उडवलं. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहेसमाधान कोळी, असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर पी.सी शिंदे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला असून सध्या पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, समाधान कोळी आणि पी.सी शिंदे हे बीट मार्शल म्हणून रविवारी मध्यरात्री गस्तीवर होते. हॅरिस ब्रीज बोपोडीजवळ दोघेही दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
————–
कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही
‘हिट अँड रन’ प्रकरणी शिंदेंचे वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.
————
शहीद लष्कराच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका
एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही
जम्मू-काश्मीरमधील (जम्मू) कुलगाम- क्वॉर्टर चकमकीत शहिद झालेल्यांमध्ये भारतीय सैन्य दलाचे महाराष्ट्रातील अकोला येथील प्रवीण जंजाळ या युवकाचा समावेश होता .मोरगाव भाकरे या गावावर एकच शोकळा पसरली आहे. ती म्हणजे अकोल्यातील प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव आज त्यांच्या नावे गावी मोरगाव भाकरे येथे येत आहे. २४ तास मुसळधार पाऊस होत आहे. गावात एकही सरकारी अधिकारी येऊन फिरकला नाही म्हंणून गावकरी चांगलेच संतापले आहेत.
———-
सगेसोयरे अध्यादेशाचीअंमलबजावणी करावी
मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य
“सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचीअंमलबजावणी करावी. येत्या सहा दिवसात ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरे च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. अन्यथा विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवारांना पाडू.” असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
———
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार | वडेट्टीवार यांनी केली टीका
रविवार रात्रीपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात साचलेलं , घरात शिरलेलं पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले. सतत धावणारी मुंबई पावसामुळे ठप्प झालू असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.रविवार रात्रीपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात साचलेलं , घरात शिरलेलं पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले. तर रेल्वे ट्रॅक्सवरही पाणी आल्यामुळे मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकलसेवा ठप्प झाल्याने कामावर निघालेले लोक मध्येच अडकले. स्टेशनवर, बसमध्ये तोबा गर्दी झाला, वाहतूक कोंडीही दिसत आहे. सतत धावणारी मुंबई पावसामुळे ठप्प झालू असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. आज मुंबईची जी दुरावस्था झाली आहे, त्यासाठी आत्ताचे सत्ताधारी आणि मुंबईच प्रशासन कारणीभूत आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
———-
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यावर | कोणत्या स्टेशनला काय मिळणार नाव
मुंबईतील व्हेक्टोरिया टर्मिनसचे नाव यापूर्वीच बदलण्यात आले. इंग्रजांच्या काळातील असणारे हे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले होते. तसेच पश्चिम रेल्वेमधील एलफिन्स्टन रोड या स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक केले होते. आता उर्वरित नऊ स्थानकाची नावे बदलण्यात येणार आहे.मुंबईतील स्थानकांना इंग्रजांच्या काळापासून असलेली इंग्रजी नावे आता इतिहास होणार आहे. ही नावे जाऊन रेल्वे स्थानकांना मराठमोळे नाव मिळणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. आता यासंदर्भातील ठराव आज सभागृहात येणार आहे. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नऊ ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाची नावे बदलली जाणार आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्या बाबत आज सभागृहात काँग्रेसच्या आमदारांकडून लक्षवेधी आणली जाणार आहे. यामुळे आजचा दिवस विधिमंडळ अधिवेशनात महत्वाचा ठरणार आहे.
Discussion about this post