• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, May 14, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Vidarbha

महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत खापरखेडा वीज केंद्राचे “पूर्णविराम” प्रथम

कोराडी केंद्राचे “गावभाग” द्वितीय तर नाशिक केंद्राचे “दोन स्पेशल” तृतीय

khabarbat news App by khabarbat news App
July 8, 2024
in local News, Maharashtra
WhatsappFacebookTwitterQR Code

नागपूर  :  नाट्यस्पर्धेत नवनवीन लोक आले पाहिजेत आणि प्रतिभासंपन्न रंगकर्मीना मोठा मंच उपलब्ध व्हावा यासाठी महानिर्मिती प्रयत्नरत आहे. नाट्यस्पर्धेतून सांघिक भावना वृद्धिंगत करून त्याचा महानिर्मितीच्या शाश्वत विकासासाठी उपयोग व्हावा असे मत महानिर्मितीचे संचालक(संचलन) संजय मारुडकर यांनी व्यक्त केले. ते महानिर्मितीच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात सायंटीफिक सभागृहात अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

वाचण्यासारखी बातमी

No Content Available

समारोपीय समारंभात  विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेंडसे  परीक्षक संजय हल्दीकर, बाळकृष्ण तिडके, संगीता टिपले तर महानिर्मितीचे  कार्यकारी संचालक पंकज सपाटे,विवेक रोकडे, मुख्य अभियंते किशोर राऊत, विजय राठोड, गिरीश कुमरवार, विलास मोटघरे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम प्रामुख्याने रंगमंचावर उपस्थित होते.

प्रत्येक वीज केंद्राने निवडलेल्या नाटकांची नांवे आणि त्या-त्या वीज केंद्राची संस्कृती तथा कार्यपद्धतीची उत्कृष्ट सांगड घालत संजय मारुडकर यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित केले. महानिर्मिती अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विक्रमी वीज उत्पादन केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेंडसे यांनी दोन महत्वपूर्ण सूचना केल्या त्यात महानिर्मितीच्या प्रतिभासंपन्न रंगकर्मीना प्रयोगाच्या आदल्या दिवशी नाट्यगृहात रंगीत तालीम व्यवस्था करून दिल्यास तांत्रिक चुका कमी होण्यास मोठा हातभार लागेल आणि जे कर्मचारी प्रथमच रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत त्यांना विशेष गुण अथवा सन्मान देण्यात यावा जेणेकरून नाटकात सहभाग वाढेल. कला आनंद देते, आपली कला लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे नाही त्याकरिता तपश्चर्या करावी लागते. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांनी ध्येय गाठण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी उदाहरण दिले. जी गोष्ट शाळेत शिकवली जात नाही ती नाटकात शिकता येते. त्यांनी महानिर्मिती नाटकांच्या नावांची अभिनव स्वरूपात गुंफण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

पंकज सपाटे म्हणाले प्रत्येक वीज केंद्राने आपल्या वर्धापन दिनाला नाट्य प्रयोग सादर केल्यास वीज केंद्रातील अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंबियांना आपली नाट्यकला दाखवता येईल. तसेच यु-ट्यूब सारख्या समाज माध्यमांवर नाट्यस्पर्धा लाइव दाखविल्यास महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंबियांना ही नाटके सहज पाहता येतील.

विवेक रोकडे यांनी आकस्मिक निधन पावलेल्या अभिजित कुळकर्णी आणि नाटकाची तुलना करताना आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि,  आयुष्य हे एक नाटक आहे, आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या भूमिका करत असतो. त्यांनी आनंद चित्रपटातील सुप्रसिद्ध डायलॉग “बाबूमोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ मे है, उसे ना तो आप बदल सकते है ना मै… हम तो सब इस रंगमंच कि कठपुतलीया है जिनकी दोर उपरवाले कि उंगलीयो में बंधी है.”

परीक्षक संजय हळदीकर म्हणाले की, महानिर्मितीचे रंगकर्मी पंढरपूर वारकऱ्यांप्रमाणे भक्तिभावाने नाटक करतात, नाटकाची जाण आहे. जाणीवा प्रगल्भित करणारी नाट्यस्पर्धा  असून महानिर्मितीमध्ये स्त्री दिग्दर्शिका आहे ही अभिमानाची बाब आहे. या नाटकांना सौंदर्य, भावनिक, बौद्धिक मुल्ये असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ही नाट्यस्पर्धा नसून कौटुंबिक सोहळा आहे, एकमेकांना भेटण्याची हितगुज करण्याची  अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळाली असल्याचे रंगकर्मी महेंद्र राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी, सेवानिवृत्त रंगकर्मींचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यात अनिल शिंदे(उरण), प्रदीप साळे(भुसावळ), अरविंद वानखेडे(पारस), राहुल बागडे(खापरखेडा), दिवाकर देशमुख(कोराडी), मुकुंद भोकरधनकर(कोराडी) यांचा समावेश होता. विजेत्या रंगकर्मींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. रंगमंचावर पहिले पाऊल म्हणून बालकलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी प्रभारी मुख्य अभियंता अभिजित कुळकर्णी यांच्या आकस्मिक निधनाबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महानिर्मिती जनसंपर्क विभागाकडून “महानिर्मिती यशोगाथा” ही चित्रफित दाखविण्यात आली. प्रास्ताविक तथा अहवाल वाचन उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम यांनी केले तर  सूत्र संचलन रवी पवार, जयंत भातकुलकर व आभार प्रदर्शन मयूर मेंढेकर यांनी केले. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

महानिर्मितीच्या ह्या नाट्यस्पर्धेत सुमारे ३०० रंगकर्मींनी सहभाग नोंदविला. एकूण ८ नाट्यप्रयोग प्रस्तुत झाले त्यात कोराडी (गावभाग),परळी(संश यात्मा विनश्यती),भुसावळ(एक्सपायरी डेट), नाशिक (दोन स्पेशल),उरण(भांडा सौख्यभरे),,खापरखेडा(पूर्णविराम),,चंद्रपूर(यक्षप्रश्न) व मुंबई(तिचे संदर्भ नसलेली गोष्ट) इत्यादींचा समावेश होता.

समारंभाला महानिर्मितीचे उप मुख्य अभियंते प्रवीण रोकडे, शैलेन्द्र कासुलकर,  अधीक्षक अभियंते सचिन भागेवार, नितीन रोकडे, गीतांजली पारखी, किरण नानवटकर, सारिका सोनटक्के, सचिन देगवेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, समन्वयक प्रवीण बुटे,   विविध नाट्य संघांचे संघ व्यवस्थापक, कल्याण अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी, नाट्यस्पर्धा आयोजन समिती, संघटना प्रतिनिधी, कलावंत/रंगकर्मी तसेच कोराडी-खापरखेडा- नागपुरातील महानिर्मितीचे अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी/रंगकर्मी व शहरातील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निकाल पत्रक

नाट्य निर्मिती
प्रथम- पूर्णविराम (खापरखेडा)
द्वितीय- गावभाग (कोराडी)
तृतीय- दोन स्पेशल (नाशिक)
उत्तेजनार्थ -एक्सपायरी डेट (भुसावळ)

दिग्दर्शन
प्रथम- महेंद्र राऊत (पूर्णविराम)
द्वितीय-मिलिंद चन्ने (गावभाग)
तृतीय- दोन स्पेशल (शशिकांत पवार)

सर्वोत्कृष्ट लेखक
मिलिंद चन्ने, नाटक-गावभाग

अभिनय पुरुष 
प्रथम- महेश होनमाने,भूमिका-नाना (एक्सपायरी डेट)

द्वितीय- सुरेश खोके, भूमिका-मनोहर (पूर्णविराम)

तृतीय- संजय सातफळे,भूमिका-बापू (गावभाग)

उत्तेजनार्थ पुरुष
शुभम गुडा, भूमिका-रानु (एक्सपायरी डेट)

देवेंद्र जोशी,भूमिका राजवाडे(भांडा सौख्यभरे)

निलेश राऊत,भूमिका-मिलिंद भागवत(दोन स्पेशल)

ज्ञानदीप कोकाटे,भूमिका-दिनकर
(यक्षप्रश्न)

सचिन मोडकवार,भूमिका सचिन(तिचे संदर्भ नसलेली गोष्ट)

अभिनय स्त्री
प्रथम- प्राची दाणी. भूमिका-अनिता नाटक-पूर्णविराम. (खापरखेडा)

द्वितीय- सायली देठे.भूमिका-दीपाली
नाटक-यक्षप्रश्न (चंद्रपूर)

तृतीय- शृजल हिरे. भूमिका-स्वप्ना जोग, नाटक-दोन स्पेशल (नाशिक)

उत्तेजनार्थ स्त्री
वैष्णवी वंजाळकर, भूमिका-लक्ष्मी(गावभाग)

प्रियंका पाटील, भूमिका-सौ राजवाडे(भांडा सौख्यभरे)

ऐश्वर्या खोसे, भूमिका-म्हातारी(एक्सपायरी डेट)

अनिता गायकवाड, भूमिका-आजी
(तिचे संदर्भ नसलेली गोष्ट)

लक्षवेधी पुरुष :
पंकज घाटोळे, भूमिका-मास्तर(गावभाग)

लक्षवेधी स्त्री :
सोनाली डोंगरे,भूमिका-बाई
(संशयात्मा विनश्यती)

नेपथ्य
प्रथम- गावभाग (कोराडी)
द्वितीय- दोन स्पेशल (नाशिक)
तृतीय- पूर्णविराम (खापरखेडा)

प्रकाशयोजना
प्रथम- गावभाग (कोराडी)
द्वितीय- दोन स्पेशल(नाशिक)
तृतीय- पूर्णविराम (खापरखेडा)

संगीत
प्रथम- दोन स्पेशल (नाशिक)
द्वितीय- संशयात्मा विनश्यती (परळी)
तृतीय- पूर्णविराम (खापरखेडा)

रंगभूषा व वेशभूषा
प्रथम- एक्सपायरी डेट (भुसावळ)
द्वितीय- संशयात्मा विनश्यती(परळी)
तृतीय-गावभाग (कोराडी)

बाल कलाकार
स्वर्णीका बाकडे- भूमिका चिंगी (गावभाग)

गटमाने-भूमिका लहान बापू(गावभाग)

विभोर चोरसे-भुमिका लहान माऊली(गावभाग)

रुही सरोदे -भूमिका रुही (तिचे संदर्भ नसलेली गोष्ट)

Post Views: 594
Tags: Mahanirmiti
SendShareTweetScan
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली बावनकुळेंची भेट

Next Post

आमदार अडकले ट्रेनमध्ये; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

khabarbat news App

khabarbat news App

ही बातमी नक्की वाचा

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

May 1, 2025
0
National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

April 27, 2025
0
थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

April 24, 2025
0
Load More
Next Post
rain

आमदार अडकले ट्रेनमध्ये; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025
टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

May 6, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025
टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

May 6, 2025
सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

May 1, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

Click to see detail of visits and stats for this site

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा