how to apply online? Link mukhyamantri ladki bahini Yojana | ladki bahin Yojana apply online
सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, ती म्हणजे माझी लाडकी बहीण. गावागावात आणि शहरात देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? कोणती कोणती कागदपत्र लागतील? अर्ज कुठे भरावे लागेल? आणि आणखी काय काय करावं लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजने नुसार राज्यातील महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
या योजनेचा लाभ कोणाला?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दिड हजार रूपये जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ वर्ष करण्यात आले आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. परंतु योजना जाहीर होऊन चार दिवस झाले तरी पोर्टल अद्याप सुरु झाले नाही. योजनेची घोषणा झाली आहे. मात्र पोर्टल अद्याप बंद आहे. त्यामुळे योजनेसाठी शासनाकडून पूर्वतयारी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
ज्या पात्र महिला आहेत त्याना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल. योजनेचे अर्ज पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करता येईल. अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला अर्जा सोबत आधार कार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आवश्य लागणार आहेत. त्याच बरोबर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण पणे विनामुल्य असेल. शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे.
योजनेसाठी मुदत वाढवली, असा केला बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ वर्ष करण्यात आले आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येणार आहे.
काय कागदपत्रे लागणार
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत), पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, हमीपत्र लागणार आहे. या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून अर्ज करता येणार होत परंतू अजून पर्यंत साईट सुरु झालेली नाही. आता 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ?
ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल. ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल. शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
मग, आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या…
Ladki Bahin Yojana Application Form
Ladki bahini yojana online apply link marathi
Discussion about this post