मुख्यमंत्र्यांकडून 11 कोटींचे बक्षीस
विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार
विश्वचषक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार करण्यात आला. विधान भवनाच्या सभागृहात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला. या वेळी राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील चार खेळाडूंना एक कोटी रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. मुंबईचा राजा, रोहित शर्मा’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो झेल टिपला नसता तर रोहित शर्माच नाही तर आम्ही सर्वांनीच त्याला बघितले असते, अशी खुमासदार टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधिमंडळात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. यावेळी विधिमंडळात हशा पिकला.
————
३ नेत्यांकडे भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी
विनोद तावडे यांच्याकडे बिहार प्रभारीपद
भाजपकडून विविध राज्यातील प्रभारी – सहप्रभारी यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ३ नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी कायम आहे. तर राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर प्रभारीपद, माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच प्रभारीपद कायम ठेवण्यात आलं आहे.
———–
माकपची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी
जेष्ठ नेत्यांची माकपच्या शिष्ट मंडळाने घेतली भेट
माकपने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्यच्या रिक्त जागी माकपच्या नरसय्या आडम यांनी दावा केला आहे. मात्र 12 पैकी 5 जागा देण्यास महाविकास आघाडीचे नेते तयार असल्याचा माजी आमदार नरसय्या आडम यांचा दावा आहे. महाविकास आघाडीतील मागच्या काही दिवसात जेष्ठ नेत्यांची माकपच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली होती.
———–
केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
NEET UG पेपर लीक प्रकरण
NEET UG पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. NEET परीक्षा रद्द करणे योग्य होणार नाही. जर परीक्षा रद्द केली तर हा होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात ठरेल. मोठ्या प्रमाणात परीक्षेत अनियमितता झाल्याचा कोणताही पुरावा नाही असे केंद्र सरकारने यात म्हटले आहे. NEET प्रकरणी ८ जुलै रोजी रेग्युलर बेंच समोर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
———–
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय
विद्यार्थिनींसाठी १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालाय. ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी आता १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आलाय.
————
खासदारकीची फक्त थपथ घेता येणार
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणली घोषणाबाजीवर बंदी
लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेताना आता घोषणा नाही तर फक्त शपथ घ्यावी लागणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा वापर करत ‘निर्देश-1’ मध्ये बदल केला असून या नुसार सदस्याने शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणतीही घोषणा देता येणार नाही. १८ व्या लोकसभेच्या खासदारांनी शपथ घेताना वेगवेगळ्या घोषणा दिल्याने वाद झालाहोता. वाद त्यामुळं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी शपथ घेतानाच्या नियमात बदल केला असल्याची माहिती आहे.
————
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा आंदोलन!
200 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांसाठी अपुरी सुविधा
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेची स्थिती दयनीय आहे. जवळपास 200 विद्यार्थ्यांसाठी शाळेत फक्त 2 शिक्षक उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. पुरेशा सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं कठीण होत आहे. या त्रासदायक परिस्थितीला कंटाळून 200 विद्यार्थी एकत्र येऊन थेट जिल्हा परिषदेत पोहोचले आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी शाळेतील खराब सुविधांसाठी आणि शिक्षकांच्या कमतरतेबाबत निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन शाळेतील सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच शिक्षकांची भरती करण्यात येईल आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
———-
डॉ प्रशांत बोकारे यांनी पदभार स्वीकारला
कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांचे निलंबन
वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आलेले राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांचे निलंबन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबतचे आदेश दिले. काल नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांचं राज्यपाल यांनी निलंबन केल्यानंतर आज नागपूर विद्यापीठचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ प्रशांत बोकारे यांनी पदभार स्वीकारला.
——-
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात वाढ
सोने दरात 400 रुपयांची वाढ
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तीन दिवसांत 3 हजार रुपयांची वाढ झाली. चांदीच्या दराने पुन्हा 90 हजारांचा आकडा पार केला असून दर 92 हजार रुपयांवर पोहोचले आहे. सोने दरात झाली 400 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर 72 हजार 700 रुपये प्रति तोळा एवढे झाले आहेत. जून महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढीचे घौडे दामटले आहे. सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
——-
राज्यभर मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली
जनजागृती रॅली राज्यभर टप्याटप्याने घेणार
6 जुलै पासून ते 13 जुलैपर्येंत राज्यभर मराठा आरक्षण शांतताजनजागृती रॅली काढणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मराठा समाजाला विनंती आहे वारंवार रस्त्याववर एकत्र याव लागेल. 13 तारखेला आमच्या व्याख्येप्रमाणे संगेसोयरे यावर सरकार शंभर टक्के निर्णय घेईल. हैद्राबाद गॅझेट लागू होईल. तर सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा पण जीआर लागू होईल. मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली राज्यभर टप्याटप्याने घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
—————
राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील पुतळे बदलण्याची मागणी
पुतळ्यावर कोल्हापूरकरांचा आक्षेप
राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील पुतळे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूरकरांच्या मागणीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सदन चर्चेत आले आहे. शाहू महाराजांच्या पुतळ्यावर कोल्हापूरकरांचा आक्षेप आहे. महाराजांच्या ऐतिहासिक वर्णनाप्रमाणे पुतळा नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
——————
भीमराव आंबेडकर दीक्षाभूमी परिसरात दाखल
जाळपोळच्या घटनेनंतर पाहणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमी येथे झालेल्या 1 तारखेचा जाळपोळच्या घटनेनंतर पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी संख्यने समर्थक सोबत होते. भीमराव आंबेडकर यांचा विजय असो म्हणत समर्थकांनी स्मारक समितीविरोधात घोषणा दिल्यात. यावेळी भीमराव आंबेडकर यांनी स्तूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलेश यांना अभिवादन केले. त्यानंतर स्तूपाच्या वरील भागात अंडरग्राउंड पार्किंग संदर्भात सुरू असलेल्या कामाची पाहणी सुद्धा केली.
Discussion about this post