आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा
कारंजा घा – महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयच वर्धा द्वारा संचालित आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्र कारंजा घा या कार्यालयांतर्गत 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( AGM) भोयर पवार सभागृह कारंजा घा येथे आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती.चंदाताई मोहळे या उपस्थित होत्या.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.राजू इंगळे सर विभागीय अधिकारी माविम नागूपर विभाग, मा.मकसूद शेख सर सहा.सहनियंत्रण मूल्यमापन अधिकारी माविम वर्धा, मा.प्रभाकर मिश्रा सर विभागीय अधिकारी ICICI बँक वर्धा, मा.मनोज कडू सर ICICI बँक अधिकारी,वर्धा,मा.स्वप्नील गोटे सर SBI व्यवस्थापक कारंजा (घा),मा.अक्षय देसाई सर SBI कारंजा,मा.सुनंदाताई ढोले CMRC सचिव,तसेच CMRC शाखा व्यवस्थापक सुनिल चिंचोळकर उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल चिंचोळकर यांनी केले.
यावेळी मा.राजू इंगळे सरांनी म्हटले की, महिलांनी त्यांची स्वत:ची आर्थिक क्षमता वाढविणे गरजेचे आहे.महिलांनी त्यांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील राहावे.तसेच ICICI बँक विभागीय अधिकारी मा.प्रभाकर मिश्रा सर यांनी महिलांना संबोधित करतांना म्हटले की,प्रत्येक माणूस हा छोटया गोष्टींपासून मोठा होत जातो. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती करण्याकरीता उद्योग व्यवसाय उभारणे आवश्यक आहे.उद्योजक बनून उद्योग करुन स्वत:चा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.असे मत यावेळी मा.प्रभाकर मिश्रा सर यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्र कारंजा ( घा) यांच्या तर्फे करण्यात आले होते.यावेळी आशाकिरण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा चंदाताई मोहळे, सचिव सुनंदाताई ढोले, व्यवस्थापक सुनिल चिंचोळकर व सर्व कार्यकारीणी व गाव प्रतिनिधी, लेखापाल,उपजिविका समन्वयक, सहयोगिनी व सीआरपी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी बलांसे यांनी मानले.
Discussion about this post