2002 मध्ये रिलायन्सने ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ या घोषणेसह टेलिकॉमच्या जगात प्रवेश केला. त्यावेळी बीएसएनएल, आयडिया एअरटेल, वोडाफोन सारख्या अनेक दूरसंचार कंपन्या भारतात होत्या. पण जेव्हा रिलायन्सने बाजारात प्रवेश केला तेव्हा भारतीय दूरसंचार उद्योगातील क्रांती म्हणून याकडे पाहिले गेले. छोट्याशा मोबाईलने जग आपल्या मुठीत आणलं. शिक्षण, संवाद, व्यवहार, मनोरंजन – जवळपास प्रत्येक क्षेत्रात मोबाईलने क्रांती घडवून आणली. छोट्याशा मोबाईलच्या माध्यमातून आज आपण जगभराशी जोडले गेले आहोत. ज्ञानाचा सागर असलेला इंटरनेट आपल्या हातात आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्या बोटांच्या टोकावर उपलब्ध आहे.
मोबाईलमुळे शिक्षण घेणं सोपं झालं आहे. जगभरातील विद्यापीठं आणि शिक्षण संस्था आपल्या घरात आल्या आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रम, व्हिडिओ ट्यूटोरियल आणि वेबिनार यांच्या माध्यमातून आपण कोणत्याही विषयात ज्ञान प्राप्त करू शकतो.
व्यवसाय आणि व्यवहारातही मोबाईल क्रांतिकारी बदल घडवून आणतोय. ऑनलाईन बुकिंग, खरेदी आणि इतर अनेक व्यवहार आता मोबाईलच्या माध्यमातून सहजपणे करता येतात. घरी बसल्या बसल्या आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करणं आणि इकडून तिकडे पैसे पाठवणं आता सोपं झालं आहे. मोबाईल हे मनोरंजनाचं उत्तम साधन आहे. चित्रपट, गाणी, खेळ, टीव्ही शो आणि इतर अनेक मनोरंजक गोष्टी आता आपल्या हातात आहेत.
मोबाईलमुळे सामाजिक संपर्कातही वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगभरातील लोकांशी जोडले गेले आहोत. मित्र, कुटुंब आणि नातेवाईकांशी संपर्कात राहणं आता सोपं झालं आहे. व्हॉट्सअप, सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉलिंग सारख्या सुविधांमुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाशी सहजपणे संवाद साधू शकतो. अशा प्रकारे, मोबाईलने आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणले आहेत.
मोबाईल हे एक अद्भुत साधन आहे, ज्यामध्ये अनेक शक्यता दडल्या आहेत. मात्र, मोबाईलचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. मोबाईलचं व्यसन टाळून त्याचा योग्य वापर करून आपण आपलं जीवन अधिक सुखी आणि समृद्ध बनवू शकतो. तथापि, मोबाईलचा अतिरेक टाळणं गरजेचं आहे. मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. नाहीतर ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’ च्या नादात ‘करलो जिंदगी मिठ्ठी मे’ असं होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.
– देवनाथ गंडाटे
– 7264982465
Source:
khabarbat News
Discussion about this post