News34
चंद्रपूर/मुंबई – विदर्भातील लेकीने उंच भरारी घेत मोठ्या पदावर मजल मारीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव मोठं केलं आहे, विजया बोरकर यांची महानिर्मिती च्या मुख्य अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली असून विशेष म्हणजे या पदावर पोहचणाऱ्या त्या प्रथम महिला आहे.
चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी केली धानाच्या शेतात रोवणी
यापूर्वी अनेक महिलांनी उपमुख्य अभियंता या पदापर्यंत मजल मारली मात्र कामात असलेला प्रामाणिकपणा व जिद्दीने लक्ष्य गाठत विजया बोरकर यांनी या पदावर विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
विजया बोरकर यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात तब्बल 2 वर्षे काम केले आहे, CSTPS मध्ये त्या उपमुख्य अभियंता या पदावर 2 वर्षे कार्यरत होत्या.
सेल्फीच्या नादात 4 युवक तलावात बुडाले
विद्युत परिरक्षण, चाचणी उपकरण व नियंत्रण विभागात 200 व 500 मेगावॅट येथे काम केले आहे.
विजया बोरकर यांनी अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE इलेक्ट्रिकल परिक्षा उत्तीर्ण केली होती, त्यानंतर नागपूर विद्यापीठातून ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीत MTECH परीक्षेत गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला.
वर्ष 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून बोरकर रुजू झाल्या, त्यानंतर कोराडी, चंद्रपूर वीज केंद्रात विविध पदे भूषवली, आता विजया बोरकर ह्या मुंबई येथील महानिर्मितीचे मुख्यालय मध्ये मुख्य अभियंता प्रकल्प व्यवस्थापन गट येथे त्यांची पदस्थापना झाली असून त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
Discussion about this post