कोणाजवळ काय सांगायचे
घरात साऱ्यांच्याच अंधार…..
भाऊभाऊ वाट्यासाठी वैर होती
शब्दच गळा कापे होऊन तलवार
आता घरोघरी मातीच्या चुली
कुणाचे ना ऐकती युवापिढी
मोठ्यांचा आदर लुप्त झाला
बदलली सगळी चाली रुढी
मनाप्रमाणे जगायचे सर्वांना
वाटे सर्वांना आता मीच मोठा
घरोघरी मातीच्या चुली.. म्हण ही
बघावयास मिळे करताना तोटा
एकविसावे शतक विज्ञानाचे
बदलाव नव्या युगाचा व्हावा
विचारसरणीत बदल आवश्यक
तंटा मात्र खरच दूर करावा..
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post