- सखे गंध तूझ्या प्रेमाचा
- दरवळला हृदयात माझ्या
- मन झूरते प्रिये माझा
- प्रेमाच्या हिंदोळ्यात तूझ्या
वाऱ्याची झूळुक येताच
तूझ्या प्रेमाचा गंध पसरला
बघ सखे माझ्या बागेतला
आज कसा गुलाब उमलला
प्रिये गंध तूझ्या प्रेमाचा
बघ कस चोहूकडे पसरला
तूझ्या येण्याच्या चाहूलीने
प्रिये इंद्रधनुष्य सुखावला
आठवतो नेहमीच मजला
दिवस तो आपल्या भेटीचा
सांजवेळी बहरला होता
गंध तूझ्या माझ्या प्रेमाचा
कवी अजय राऊत
Discussion about this post