News34
छत्तीसगड – कोळसा खाण वाटप घोटाळ्यात लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना 18 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या घोटाळ्यात अनेकांना आधीच अटक करण्यात आली होती, अजूनही अनेक मोठ्या नावाचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. IAS समीर बिष्णोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी व कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल हे आजही तुरुंगात आहे.
आज ही कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात अनेकांची ED मार्फत चौकशी सुरू आहे, आज दिल्लीतील विशेष कोर्टाने विजय दर्डा सहित त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता, के.एस. कोफ्रा, के.सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
विशेष न्यायालयाने घोटाळ्यातील आरोपींवर IPC कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमाखाली दोषी ठरविले आहे.
Discussion about this post