News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – तालुका कृषी अधिकाऱ्यांनी चालू खरीप हंगामाकरिता पुरेसा खताचा साठा उपलब्ध करुन देऊन खताचा काळा बाजार होणार नाही यासाठी भरारी पथक नेमण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार यांनी पत्राद्वारे केली आहे.
सन २०२२ – २४ चा खरीप हंगाम सुरू झालेला असून शेतकऱ्यांना खताचा मोठया प्रमाणात आवश्यकता निर्माण होणार आहे. त्यामूळे, कोणत्याही शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खताचा पुरवठा होईल आणि कोणीही शेतकरी परत जाणार नाही. व त्यांच्या मेहनतीचा वेळही वाया जाणार नाही.
यासाठी मूल तालूक्यातील शेतकऱ्यांचे मागणीनुसार खताचा पुरवठा होईल यादृष्टीने आपले स्तरावरून आताच मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात यावा.तसेच, अनेक खत विक्री केंद्रावर बाजारमुल्यापेक्षा जादा दर आकारून अधिकची रक्कम घेवून विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास शेतकऱ्यांना शासन दरानुसारच विक्री करण्याकरिता आपले स्तरावरून संपूर्ण कृषि केंद्र व खत विक्रेत्यांना सुचना देण्यांत येवून जो विक्रेता बाजारभाव पेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे आढळल्यास तात्काळ त्यांचा परवाना रद्द करण्यांत येवून त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यांत यावे. जेणेकरून शेतकऱ्यांची लुटमार होणार नाही.
तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता कोणत्याही प्रकारची अडवण होणार नाही यांची काळजी घ्यावी. तसेच, खताचा काळाबाजार किंवा जास्त दराने खते विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास आपल्या प्रशासनाचे विरूध्दात आंदोलन करण्यांत येईल व यांची सर्वस्वी जबानदारी आपल्या प्रशासनाची राहील. अशी ताकीद देखील सभापती राकेश रत्नावार यांनी दिली आहे.
Discussion about this post