आनंदवन परिवारानी प्रेमभावना वृद्धिंगत करुन समाज साधला : सदाशिव ताजने
चंद्रपूर – बाबा आमटे यांनी आनंदवनद्वारा समाजातील बधिर झालेल्या संवेदना जागृत करण्यासाठी भारत जोडो यात्रा द्वारा मानव सारा एक है हे बिंबविण्याचा प्रयत्न केला तोच वारसा व वसा घेऊन आम्ही समाज सांधण्याचा उपक्रम स्वरानंदवन द्वारा सुरु असून आमच्या सर्व टीमचा कौटुंबिक सत्कार सन्मानाचा कार्यक्रमाचे हिरकणी महिला समूहाच्या सीमा ठाकूर, हर्षा थुल, सुषमा नगराळे,रेखा दुधलकर, अलका मोटघरे व इतरांनी आयोजीत केल्याबदल आनंदवन म. से. समिती विश्वस्त श्री सदाशिव ताजने यांनी बोलताना विशेष आभार मानलेत
कार्यक्रमाला राजेश ताजने, नंदा बिहाडे, राजश्री शिंदे, सीमा दुपारे ,संगीता परनाटे ,पूजा पान्हेरकर, देवराव कोंडेकर, अशोक खाडे, नितीन राव,प्रसाद पान्हेरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सर्व कलावंताचे औंक्षण करुन पुष्पवर्षाव ,भेटवस्तू व चहापान देऊन कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन भावपुर्ण निरोप देण्यात आला.
Discussion about this post