एकनिष्ठ प्रेमाचे
वचनबद्ध नाते
अतूट विश्वासाचे
नविन गीत गाते..1
प्रेम दोन जीवाचे
बांधतात बंधन
रेशमाच्या धाग्यात
एकजीव गुंजन..2
शब्दांची दिसे धार
शब्दातच गुंफे माळ
साक्ष दे राम कृष्ण
लोटले बहू काळ..3
वचनबद्ध नाते
सदैव जपायचे
शब्द शब्दांची माळ
ऋण तया राहायचे..4
ढाल एक नविन
वचनबद्ध नाते
तोड नसे नात्याला
घट्टबंधन राहाते..5
कवयित्री हर्षा भुरे, भंडारा
Discussion about this post