कवयित्री हर्षा भुरे यांनी लिहलेली सुंदर कविता नक्की वाचा
*ओल्याचिंब वाटेवरी*
शीर्षक:- ओलीचिंब वाट
*********************
सोबतीला प्रिय सखी
ओल्याचिंब वाटेवरी
रिमझिम बरसाव्या
पावसाच्या गार सरी …१
गुज मनाचे सांगते
नव्या रंगाची चाहूल
सुर ताल छळतात
मागे खेचते पाऊल…२
वाट झालीय अंधुक
कुणी दिसेना समोर
हात सखीचा हातात
मनी नाचतोय मोर…३
डोळ्यांपुढे उभी दिसे
सखी साजणी देखणी
आले खुलून सौंदर्य
चिंब डोळ्याची पापणी…४
ओल्याचिंब वाटेवरी
येई अंगाला शहारा
वारे भरले प्रेमाचे
देई हळूच इशारा…५
हवीहवी वाटे मज
प्रीत ओलीचिंब वाट
जवळच वाटतात
दूर अंतराचे घाट…६
*********************
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post