Maharashtra Breaking News
राजस्थान राज्यात झालेल्या भीषण अपघातात जळगावातील अमळनेर तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने दोन शिक्षकांची कुटुंब राजस्थानमध्ये फिरायला गेली होती.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील सहा जणांचा राजस्थानमध्ये कार (Amalner Rajasthan Car Accident) अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यावर (Amalner Jalgaon) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षकांचे कुटुंबीय या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचे नातेवाईक घटना कळताच राजस्थानकडे रवाना झाले आहेत.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा बाबूलाल मैराळे उर्फ सुरेखा धनराज सोनवणे वय 50, मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे वय 5 वर्षे तसेच गायत्री योगेश साळुंखे वय 30, प्रशांत योगेश साळुंखे वय 7, भाग्यलक्ष्मी साळुंखे वय 1 या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
मांडळ येथील शिक्षक धनराज नगराज सोनवणे (वय 55, रा. बेटावद) आणि योगेश धोंडू साळुंखे (रा. अर्थे. ता. शिरपूर, हल्ली मुक्काम पिंपळे रोड, अमळनेर) या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब एका गाडीत आणि दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब एक गाडीत अशा दोन चार चाकींवर राजस्थान फिरायला गेले होते.
आज, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला त्यांच्या वाहनाची धडक बसली. डोरीमना गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सोनवणे आणि सांळुखे असलेल्या कारने एका कंटेनरला धडक दिली असल्याचे म्हटले जात आहे.
Discussion about this post