Phone pay, Paytm transactions halted across the country; take ‘this’ solution immediately
भारतात डिजिटल व्यवहारांची सवय अधिक गडद होत चालली असताना UPI व्यवहारांमधील अडचणींनी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला हैराण केले आहे. देशभरात आज पुन्हा एकदा UPI सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली असून, ग्राहकांच्या रोजच्या व्यवहारांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
🔸वापरकर्ते त्यांच्या बँक खात्यांमध्ये लॉगिन करू शकत नव्हते आणि कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नव्हता. यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष बाब म्हणजे, देशातील बहुतेक बँकांनीही याच समस्येचा सामना केला, त्यामुळे हा तांत्रिक बिघाड केवळ एका अॅपपुरता मर्यादित राहिला नाही.
🔸अनेकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, बँका आणि अॅप सेवा पुरवठादारांनी किमान पूर्वकल्पना तरी द्यायला हवी होती. UPI हे भारतातील आर्थिक व्यवहारांचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. त्यामुळे अशा अचानक सेवा बंदीमुळे लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे महत्त्वाचे व्यवहार, किराणा खरेदी, प्रवास भाडे किंवा वैद्यकीय देयकं अडकली आहेत.
🔸जर एकाच UPI अॅपवर वारंवार अडचण येत असेल, तर दुसरं UPI अॅप वापरून व्यवहार करून पाहा. उदाहरणार्थ, Google Pay वर अडचण असल्यास PhonePe किंवा Paytm वापरून पहा. UPI सेवा काही काळासाठी बंद असेल, तर पर्याय म्हणून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा रोख रक्कम वापरणे श्रेयस्कर ठरते. व्यवहार करताना UPI आयडी किंवा मोबाईल क्रमांक चुकीचा दिल्यास देखील व्यवहार फेल होऊ शकतो, त्यामुळे माहिती नीट तपासूनच टाका.
Discussion about this post