राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा
सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
[tta_listen_btn]
ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक यांनी सोमवारी (२७ मे) राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली. केंद्रपारा येथे आयोजित एका सभेला नवीन पटनायक यांनी संबोधित केले. यावेळी ओडिशात जुलैपासून कोणालाही वीज बिल भरावे लागणार नाही. बीजेडी सरकार जनतेला मोफत वीज देणार आहे, असे नवीन पटनायक यांनी सांगितले. (Odisha Chief Minister Naveen Patnaik)
या सभेत बीजेडी नेते आणि 5टी चे अध्यक्ष व्हीके पांडियन देखील उपस्थित होते. यावेळी व्हीके पांडियन म्हणाले की, राज्य सरकारच्या बीएसकेवाय योजनेंतर्गत लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळत राहतील. तसेच, लोकांना मोफत वीजही दिली जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय, नवीन पटनायक हे ९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा सुद्धा व्हीके पांडियन यांनी केला. (pay electricity bill)
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी (27 मे) राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली. बीजू जनता दल (बीजेडी) प्रमुख पटनायक यांनी केंद्रपारा येथे एका सभेला संबोधित करताना सांगितले की, ओडिशात जुलैपासून कोणालाही वीज बिल भरावे लागणार नाही. ते म्हणाले की बीजेडी सरकार जनतेला मोफत वीज देणार आहे.
बीजेडीच्या जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.
बीजेडीने आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा सरकार स्थापन झाल्यास 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. बीजेडी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास बचत गटांना 20 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जासह अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.
100 ते 150 युनिट वीज वापरावरही ग्राहकांना सवलत दिली जाईल, असा दावा पक्षाने केला होता. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील 75 टक्के घरे 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे.
पटनायक मुख्यमंत्री झाले तर ते हा विक्रम करतील
ओडिशा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नवीन पटनायक गंजाम जिल्ह्यातील हिंजली विधानसभा मतदारसंघातून राजकीय मैदानात उतरले आहेत. सीएम पटनायक 2000 पासून सलग पाच वेळा या विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. यावेळी विजयासह भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम पटनायक यांच्या नावावर नोंदवला जाईल.
ओडिशामध्ये 1 जून रोजी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. ओडिशाच्या लोकसभा आणि विधानसभा जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.
हे संपादक गांजा पिऊन लेख लिहितात
देवेंद्र फडणवीस यांची टीका
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका. ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत. तिथे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी उपचार घ्यावा, असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी चढवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे नेते बसवून ठरवतील. भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील. इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
80-90 जागांचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे
भुजबळांची दादांना आठवण
आपण सत्तेत सहभागी होताना भारतीय जनता पक्षाने विधानसभेला 80 ते 90 जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा, लोकसभेत जी खटपट झाली. ती विधानसभेत होता कामा नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक आटोपून आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली असतानाच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडलीय.
दहावीमध्ये नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्के
विभागात गोंदीया जिल्हा अव्वल
इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नागपूर विभागाचा निकाल ९४.७३ टक्के लागला अाहे. दहावीमध्ये विभागात ९५.६२ टक्के घेत गोंदीया जिल्हा अव्वल तर ९१.०६ टक्क्यांसह वर्धेचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेकरिता नागपूर विभागातून १ लाख ५१ हजार ०२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ४९ हजार ८१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी १ लाख ४२ हजार ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३८,५३० विद्यार्थी ७५ टक्के गुण मिळवित प्रावीण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभाग ९४.७३ टक्केवारी सह सर्वात कमी आहे, तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97 पूर्णांक 21% तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ७२ विषयांपैकी 18 विषयांचा निकाल शंभर टक्के लागलाय, दरम्यान दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86% इतकी आहे.
‘मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेन
पुणे पोर्शे दुर्घेटनेतील आरोपी डॉ. तावरेचा इशारा
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. या दोघांनाही 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे पोलिसांनी अटक करताच डॉ़ तावरे यांनी गंभीर इशारा दिला असून त्यामधून या प्रकरणाचं खरं सत्य बाहेर येऊ शकते.
शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला
एक जून रोजी आठ राज्यातील 57 जागांवर मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते रॅली आणि रोड शो करत आहे. या टप्प्यात एक जून रोजी आठ राज्यातील 57 जागांवर मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज उत्तर प्रदेश मधील कुशीनगर सालेमपूर आणि चांदोली इथं निवडणूक रॅली काढली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी ओडिशातील बालस्वर इथं जाहीर सभेला संबोधित केलं. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव गाजीपुर आणि चंदोली इथं आपल्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार केला.
रेमल चक्रीवादळ धडकले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक
बांगलादेशातील खेपुपारा आणि पश्चिम बंगालच्या दक्षिण परघना जिल्ह्यातील सागर यांच्यामध्ये रेमल चक्रीवादळ धडकले. वादळ आणि मुसळधार पावसामुळे कोलकत्ता सह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रेमल चक्रीवादळ हाताळण्याबाबत आढावा बैठक घेतली. केंद्र सरकारने राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देऊ केल असल्याचं बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी सांगितलं.
राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा
सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक यांनी सोमवारी (२७ मे) राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केली. केंद्रपारा येथे आयोजित एका सभेला नवीन पटनायक यांनी संबोधित केले. यावेळी ओडिशात जुलैपासून कोणालाही वीज बिल भरावे लागणार नाही. बीजेडी सरकार जनतेला मोफत वीज देणार आहे, असे नवीन पटनायक यांनी सांगितले.
Discussion about this post