सर्वोच्च न्यायालयात ४ मार्चला सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी पुढे ढकलली

चार वर्षांपासून रखडल्या निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. आज हे प्रकरण 29 व्या क्रमांकावर होते, पण कोर्ट क्रमांक 3 मध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंतच कामकाज होणार होते. 8 व्या क्रमांकापर्यंतची प्रकरणे कोर्टाने ऐकली. त्यानंतर कामकाज संपले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातनिवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या असून, सर्वोच्च न्यायालयात ४ मार्चला सुनावणी होईल.

आज (मंगळवार, २५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीकडे राज्यातील जनतेचं व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होते. न्यायालय या संदर्भात शासनाला, निवडणूक आयोगाला काय निर्देश देणार याबाबत सर्वांच्याच मनात उस्तुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज (२५ फेब्रुवारी) सुनावणी झाली. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. याप्रकरणा आता ४ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत. दोन्ही बाजूच्या वकीलांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख सुचवली होती. त्यावर न्यायालयाने अनुकूलता दर्शवली.
Discussion about this post