जेपी नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध जोरदार सुरू झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेपी नड्डा गेल्यानंतर आता नव्या चेहऱ्याकडे भाजपची कमान सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर जेपी नड्डा हे भाजपचे कार्याध्यक्ष होते. यानंतर, त्यांना जानेवारी 2020 मध्ये पूर्णवेळ भाजपाध्यक्ष बनवण्यात आले, जेपी नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जानेवारीत संपला होता, पण त्यानंतर निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळेच आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. अशातच भाजपच्या अध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असेल त्याचं नाव हे आरएसएसच्या मुख्यालयात ठरणार असल्याची माहिती आहे. . जेपी नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपला होता, मात्र त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांना दिलेली मुदतवाढही आता ३० जूनपर्यंत संपत आहे. त्यामुळे भाजप नव्या अध्यक्षाच्या शोधात असून ज्यांच्या नावांची चर्चा होती त्यांनाही केंद्र सरकारचा भाग बनवण्यात आले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक भाजपा नेत्यांची नावे सामील आहेत. भाजपा नेते बी.एल. संतोष, सुनिल बन्सल, फग्गन सिंह कुलस्ते, केशव प्रसाद मौर्य आदींची नावे भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. परंतू एक नाव विनोद तावडे यांचेही असून याच नावावर पक्षश्रेष्टी मोहोर लावतील असे म्हटले जात आहे.
Discussion about this post