परंतु प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडले ना त्याचे काय त्यांची करमणूक झालीच कुठे अंतिम सामना चांगला चुरशीचा होईल, खेळात मजा येईल, विविध फटके पहावयास मिळतील, गोलंदाजांचाही कस लागेल, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पहावयास मिळेल, या आशेने आलेल्या प्रेक्षकांच्या पदरी मात्र घोर निराशा पडली याला जबाबदार कोण व असे का घडले याचाही आता कुठेतरी विचार होणे गरजेचे आहे.
अंतिम सामना तिकीट काढून बघायचा असा विचार क्रिकेट प्रेमी खूप आधीपासूनच करतात. व्यवस्थित प्लॅनिंग करून तिकीट बुक करण्यात येते . तिकीटही खूप महाग असते. परंतु क्रिकेट प्रेमी त्याकडे थोडे दुर्लक्ष करून आनंदाकरता तिकिटाची रक्कम खर्च करतो, यावेळी तर नेहमीपेक्षा जास्त तिकिटाचे दर होते. (asia cup final 2023 ) आयोजक संस्थेने फारच जास्त दर ठेवले म्हणून आरडा ओरड ही सुरुवातीला झाली. इतकेच नव्हे तर जास्त दरामुळे सुपर चार मधील मॅचेस कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.
परंतु अंतिम सामन्याच्या वेळी स्टेडियम (Cricket Stadium) भरले होते. अंतिम सामना पाहण्याकरिता क्रिकेट (Cricket) प्रेमी फक्त त्या शहरातीलच राहतात असे नव्हे, तर दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावरील गावातूनही सामन्याचा आनंद उपभोगण्याकरिता येत असतात.त्यात तिकिटासोबतच त्यांच्या येण्या-जाण्याचा व खाण्यापिण्याचाही खर्च असतोच, या खर्चाचे काय ? याचा कोणी विचार करणार आहे की नाही ? असे प्रश्न आता अशा सामान्यांमुळे निर्माण होऊ लागले आहेत . हे प्रेक्षकांचे पैसे एक प्रकारे वायाच जातात त्याची जबाबदारी कोण घेणार ? फक्त प्रेक्षकांचेच नव्हे तर जाहिरातदारांचेही पैसे वाया जातात टीव्हीवरील जाहिराती, प्रत्यक्षात ग्राउंड वरील जाहिराती या पूर्ण आठ तास दिसतील व आपला ब्रँड त्या माध्यमातून जनतेवर बिंबविला जाईल असा दृष्टिकोन ठेवून जाहिराती दिल्या जातात. अशा मॅचेस थोडक्यात संपल्याने त्यांचा उद्देश पूर्णत्वास जात नाही व पैसेही वाया जातात त्याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा. मागील वर्षी तर काही टेस्ट मॅचेस (पाच दिवसांच्या) अगदी अडीच आणि तीन दिवसातच संपल्या. अशावेळी अनेकांचे नुकसान होते त्याची भरपाई कशी करणार यावरही विचार होणे गरजेचे आहे. (asia cup final 2023 )
जेव्हा मॅचेस अशा अर्धवट वेळेत एकतर्फी संपतात किंवा पाच दिवसांच्या तीन दिवसात संपतात तेव्हा आयोजक संस्थेने प्रेक्षकांचे अर्धे पैसे परत करावयास हवे. जाहिरात दारांसाठी वेगळी नियमावली तयार करण्यात यावी, मात्र जर प्रेक्षकांची करमणूक करू शकलो नाही, त्यांना खेळाचा आनंद देऊ शकलो नाही तर त्यांचे अर्धे पैसे परत निश्चितच करावयास हवे. आणि ज्याच्यामुळे मॅच लवकर संपली त्यांच्यावर दंड आकारन्यात यावा, त्यांना मिळणारी रक्कम ही आयोजक संस्थेने कपात करून घ्यावयास हवे. तसेच लवकर संपल्यास जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा. (Cricket Stadium )
श्रीलंकन कर्णधाराने प्रेक्षकांची माफी मागितली.
मी अत्यंत दुःखी आणि निराश झालो. असे त्याने म्हटले ! अरे हो! पण आपले मानधन परत केले का ? नाही ना ? नुसते कोरडे दुःख जाहीर करून काय उपयोग?
सुनील देशपांडे
asia cup final man of the match
asia cup final match
ind vs pak asia cup 2023 highlights
pak vs afg
bangladesh next match
matheesha pathirana
eng vs ire
Discussion about this post