मुनगंटीवारांनी सुरु केला पुन्हा विकासकामाचा धडाका
राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणारे आणि तळागाळातील सामान्य माणसाच्या विकासाचा ध्येय घेऊन शब्द पूर्ण करणारे नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान आटोपत नाही तोच, निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा न करता त्यांनी पुन्हा विकासकामाचा धडाका सुरु केलाय.
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढली. त्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ४ जून रोजी निकाल हाती येणार आहे. “जिंकलो तर माजायचं नाही आणि हरलं तर लाजायच नाही” अशी कार्यशैली असलेल्या मुनगंटीवार कोणतीही विश्रांती न घेता कामाला लागले आहेत.
पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पायाभूत सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांच्या विकासासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाचा माईल स्टोन गाठत असतानाच क्रीडा क्षेत्रात आणखी एक टप्पा त्यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले जलतरण केंद्राचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले असून शहरातील जलतरणपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथील जलतरण तलाव नूतनीकरणाकरिता जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर कडून २०२२-२०२३ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून एक कोटी ५७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून जलतरण तलावातील वॉटरप्रूफिंग, टाइल्स फिल्टरेशन प्लांट, प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीच्या कामांसह विद्युतीकरण तसेच प्रकाश झोताची व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, रेलिंग टेक एरियाची दुरुस्ती इत्यादी कामे हाती घेण्यात आली होती. आता ही कामे पूर्ण झाली असून शहरातील जलतरणपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहेत आणि तिन्ही ट्रॅक चंद्रपूर येथील क्रीडा संकुलात, विसापूर क्रीडा संकूल आणि सैनिक स्कूलमध्ये आहेत. याशिवाय पोलिसांचे सर्वोत्तम जीम चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा आदी ठिकाणी उत्तम स्टेडीयम उभारण्यात येत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते, हे विशेष.
मुनगंटीवार इतक्यावरच थांबले नाहीत, तर चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे आकाराला येत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली. या अद्ययावत केंद्राच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी प्रशासनाला दिले.
चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता. 27) पाहणी केली. अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज असे 140 खाटांच्या हॉस्पिटलचे 80 टक्के कार्य पूर्ण झालेले आहे. उर्वरित 20 टक्के काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा त्यांचा मानस आहे.
Discussion about this post