रजत डेकाटे / प्रतिनिधी नागपूर✍️
भिवापूर तालुक्यातील अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत एका सामाजिक कार्यकर्त्याने अख्ख्या तालुक्यात सभापती बाळू इंगोले यांना घाम फोडल्याची चर्चा आहे.
बाळू इंगोले हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे यांच्या गावात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस ला यश प्राप्त झाले असले तरी एका नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मनोहर वानखेडे यांनी त्यांच्या पॅनल च्या वार्ड क्र १ च्या उमेदवार प्रणय अरुण चौधरी यांना पराभवाची धूळ चारुण वार्ड क्र १ वर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मनोहर वानखेडे हे पहिले कांग्रेसचे त्यांची पत्नी सरपंच होती.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत बाळू इंगोले व मनोहर वानखेडे ह्या दोन्ही नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक एकत्र येऊन लढली होती.
आता मात्र तसे झाले नाही मालेवाडा ग्रामपंचायत मध्ये हुकूमशाही व मनमर्जी कारभारामुळे चालतं असल्याने मनोहर वानखेडे यांनी गावातील ग्रामपंचायतचा विकास कसा करता येईल याचा संकल्प हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मनोहर वानखेडे हे मालेवाडा येथील सामाजिक कामात अग्रेसर असतात.त्यांनी काही दिवसांपूर्वी पिक विमा कंपनी संदर्भात आंदोलन केले होते. मनोहर वानखेडे यांनी गावातील नागरिकांना गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
Discussion about this post