वंचितच्या उमेदवाराने दिली लॉची परीक्षा
भीमपुत्र विनय भांगे यांचे सामाजिक आणि राजकीय जीवनातही शिक्षणाला प्राधान्य
नागपूर, २२ ऑक्टोबर: आजच्या युवापिढीचे प्रतिनिधित्व करणारे भीमपुत्र विनय पुरुषोत्तम भांगे यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे. अशातच त्यांनी आज विधि व कायदा शिक्षणाच्या परीक्षेसाठी अण्णासाहेब गुंडेवार कला व वाणिज्य महाविद्यालय, छावणी, काठोल रोड, नागपूर येथे उपस्थिती लावली. आपल्या व्यस्त सामाजिक आणि राजकीय जीवनातही त्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे आज दिसून आले.
भीमपुत्र विनय भांगे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत, जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ लॉचे ते विद्यार्थी आहेत. सध्या एल.एल.बी. (३ वर्षे) च्या सहाव्या सत्रात शिक्षण घेत आहेत. या सत्रात “मालमत्तेचे हस्तांतरण कायदा (LAW OF TRANSFER OF PROPERTY),” “स्त्री आणि कायदा (WOMEN & LAW),” आणि “पर्यावरण कायदा” (ENVIRONMENTAL LAW) या तीन प्रमुख विषयांची परीक्षा सुरु आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. याच दिवशी परीक्षा आल्याने त्यांनी शिक्षणाला महत्त्व देत आज २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. पेपर सोडवून परत आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
परीक्षेची तयारी आणि निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना भीमपुत्र विनय भांगे सांगितले की, “एकीकडे शिक्षण पूर्ण करणे महत्वाचे आहे, तर दुसरीकडे लोकसेवा आणि निवडणुकीसाठी देखील तेवढीच तत्परता आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्याने मी व्यवस्थित नियोजन केले आहे.
Discussion about this post