*केंद्रातील सरकारला बदलून देशाला गुलामगिरीपासून वाचवा
*बल्लारपूर येथे जनसंवाद पदयात्रेचा समारोप*
चंद्रपूर : सध्या संविधान बदलून देशाला गुलामगिरीकडे नेण्याचे धोरण सुरु आहे. काँग्रेसने उभारलेल्या शासकीय कंपन्या दोन मित्रांना विकण्याचा घाट हे सरकार करीत आहे. त्यामुळे आता या सरकारलाच घरी बसविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. बल्लारपूर शहरात जनसंवाद पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या कि, केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षेप्रती अतिशय उदासीन असल्याचे चित्र आहे. मणिपूर सारख्या गंभीर विषयावर महिलांना सभागृहात बोलू दिल्या जात नाही. त्यासोबतच मनकी बात मध्ये तासंतास बोलणारे प्रधानमंत्री मणिपूर विषयावर ब्र देखील काढत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या २०२४ च्या निवडणुकीत या सरकारच्या विरोधातील असंतोष दिसून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केलीत.
यावेळी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, नंदू नगरकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, युवा नेते शिवा राव, माजी नगरसेवक राजेश अडूर, महिला शहर अध्यक्षा ऍड. मेघा भाले, तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद, प्रदेश प्रतिनिधी डॉ. रजनी हजारे, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, सुनंदा आत्राम, छायाताई मडावी, डॉ. सुनील कुडीलवार, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, डॉ. अनिल वाढई, नरेंद्र मुंदडा, कायदल्ली, जयकारांण सिह, शोभा महंतो, रोनीदा जामुद्दिन, रवींद्र कोडापे यांची उपस्थिती होती.
Discussion about this post