ॲड. विजयराव जाधव यांनी राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात आयोजित विविध कार्यक्रमात घेतला सहभाग
वाशिम ता. २२ जानेवारी: जय श्रीरामचा जयघोष, शंखनाद, ५० हून अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात आज (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. श्रीराम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज देशभरात उत्सव साजरा करण्यात आला. वाशिम मध्ये सुद्धा विविध ठिकाणी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
हा सोहळा साजरा करण्यासाठी माजी आमदार ॲड. विजयराव जाधव यांनी शहरात आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
आजच्या दिवसाची सुरुवात ॲड. विजय जाधव यांनी पाटील अँड कंपनीमध्ये गणपती बाप्पाची आरती करून केली. त्यानंतर श्री व्यंकटेश सेवा समिती व क्रीडा भारती द्वारा संचालित हनुमान क्रीडा प्रबोधनीतील खेळाडू तर्फे आयोजित ‘रन फॉर श्रीराम’ मध्ये सहभागी झाले. पुढे सिंधी कॉलनी व व्यापारी आघाडी वाशिम द्वारा आयोजित बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. तसेच श्रीराम मंदिर वाशिम येथे मनोभावे महारती करून वाशिम करांच्या प्रगतीसाठी कामना केली.
नंतर शिरपूर जैन व रिसोड येथे आयोजित मिरवणूक व महाआरती मध्ये सहभागी झाले. यावेळी कारसेवकांचा सत्कार केला.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारतीय अस्मितेचा हा संघर्ष होता. आजचा दिवस पाचशे वर्षातील सर्वात पवित्र व ऐतिहासिक दिवस आहे. ज्यांना रामसेवेत सहभागी होता आले ही धन्यता आहे, असल्याची भावना आज ॲड. विजयराव जाधव यांनी व्यक्त केली.
Discussion about this post