• वणी नगर परिषद निवडणूक २०२५ •
प्रभाग क्र. ११ मध्ये ‘शिवसेना (शिंदे)’ चा दणदणीत प्रचार
वणी (यवतमाळ) । दि.२३/११/२०२५ :
वणी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (शिंदे गट) जोमात उतरली असून, प्रभाग क्रमांक ११ मध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी शिवसेना यवतमाल जिल्हा संपर्कप्रमुख विजय चोरडीया यांच्या नेतृत्वात जोरदार प्रचार सुरू आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायलताई तोडसाम, तसेच नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार शेख मोहम्मद आल्ताफ रहिम आणि सोनाली नितीन आत्राम यांच्यासाठी राबवलेल्या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रचार रॅलीला शिवसेना नेते आशिष गुप्ता, राहुल मुजेकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.

प्रभाग क्रमांक ११ मधील मतदारांनी उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असून, शिवसेना (शिंदे) ला येथे मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
वणी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आक्रमक भूमिका घेताना दिसत असून, पुढील काही दिवस प्रचाराला आणखी वेग येणार आहे.
●○●
















Discussion about this post