The advertisement for the post of Vice-Chancellor of the University has finally been released
अमरावती, 15 ऑक्टोबर 2023: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 कलम 11 (3) (च) नुसार कुलगुरु पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या प्रख्यात शिक्षणतज्ञ व्यक्तींकडून या विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संस्थांना सुध्दा योग्य उमेदवाराची नामनिर्देशने पाठविता येतील.
कुलगुरु पदासाठीची विहित शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या आणि या प्रतिष्ठेच्या व आव्हानात्मक जबाबदारीचे काम करण्यास इच्छूक व्यक्ती अर्ज करु शकतात. विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव, अर्जाचा नमुना आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा तपशिल दर्शविणारी सविस्तर जाहिरात www.sgbau.ac.in या संकेतस्थळामध्ये उपलब्ध आहे. https://sgbau.ac.in/pages/AdvertisementP.aspx
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 असून त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
नागपुरातील शाळेत विविध पदासाठी रविवारी मुलाखती(Opens in a new browser tab)
नव्या कुलगुरूंची प्रतीक्षा
तत्कालीन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे गंभीर आजाराने 28 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. तेव्हापासून अमरावती विद्यापीठाचा प्रभारी कारभार सुरु आहे. हल्ली नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार सांभाळत आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासासाठी कायमस्वरूपी कुलगुरूची नियुक्ती आवश्यक आहे. मात्र, निवड प्रक्रियेत विलंब होत असल्याने विद्यापीठाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गात नाराजी आहे.
Discussion about this post