खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा
विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले पत्र

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला. वरोरा विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यावर २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. विशेष म्हणजे, धानोरकर २ लाख ६० हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. खासदार म्हणून निवडून आल्याने धानोरकर यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला.

Discussion about this post