मुंबई । मुलुंडमध्ये शिवसदन बिल्डिंग या सदनिकेच्या गुजराथी सचिवानी ‘महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड’ म्हणत घर नाकारल्याचा प्रकार घडला. त्या घटनेचा व्हिडीओ आणि मनःस्ताप व्यक्त करणारा व्हीडीओ फेसबुकवरून वायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. मराठी माणसांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर माध्यमांनी प्रकरण उचलून धरले.
ब्लुटिक मीडिया सोल्युशन्सच्या संचालिका तृप्ती देवरुखकर (Trupti deorukhkar) आणि त्याच्या पतीसोबत हा प्रकार घडला. ही माहिती कळताच मनसे पदाधिकारी धावून आले. त्यांनी सदनिकेच्या गुजराथी सचिवाना जाब विचारला. मग, प्रकरण राजकीय नेत्यांनी उचलून धरले. विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत कारवाई केली. त्या व्यक्तीचे वय पाहता त्याला समजवण्यात आलं आणि माफीही मागायला सांगितली. माझी चूक झाली, मी मराठी माणसाची माफी मागतो असं तो व्यक्ती बोलताना व्हिडीओमध्ये दिसतोय.
ब्लुटिक मीडिया सोल्युशन्सच्या संचालिका तृप्ती देवरुखकर याना ऑफिससाठी ते घर हवे होते. सोसायटीच्या सचिवांनी महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड म्हणत अरेरावीची भाषा केली आणि हुज्जत घातली. सोशल मीडियावर उघड केल्यानंतर एकच खळबळ माजली. सोशल मीडियावर महिलेने आपली व्यथा मांडली आहे. (mumbai mulund marathi woman denying house state commission for women instructions Rupali chakankar Action)
ही घटना व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.
मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देण्याचा मुद्दा उफाळून आला आहे. महाराष्ट्रीयन माणसांना आम्ही इमारतीमध्ये कार्यालय देत नाही असं सांगून त्या इमारतीतल्या गुजराती व्यक्तींनी इमारतीमध्ये भाड्यानं देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ह्या भगिनीला घेऊन त्या मुजोर माणसाला भेटले. त्या मुजोरांना जाब विचारला आणि महाराष्ट्र सैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या मुजोरांनी तमाम मराठी माणसांची जाहीर माफी मागितली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आमचा लढा सुरू आहे, असे मनसेने सांगितले.
त्यानंतर मुलुंडमधील घटनेवरुन शिवसेना आणि मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधत साधला. आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील टीका करत एवढा माज कोठून आला? असा सवाल शिंदे सरकारला केला आहे.
मुलुंडमधील घटनेची शिवसेना उद्धव ठकरे गटाकडून दखल घेण्यात आली आहे. मराठी माणसाला घर देण्यास मनाई करणाऱ्यांमध्ये हा एवढा माज कोठून आला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. मराठी माणसाला कार्यालय नाकारण्यात माज कोठून आला.
शिवसदन बिल्डिंग, मुलुंड प. महाराष्ट्रात मराठी माणसाला अलाउड नाही असं म्हणण्याची मुजोरी या लोकांमध्ये कुठून येते ?सर्वसामान्यांचे सरकार म्हणवणारे @CMOMaharashtra & @Dev_Fadnavis याच्यावर काही कारवाई करतील का? खोट्या केसेस आणि राजकीय घोरघोड्या यातून वेळच मिळत नाही, अशी टीका SushmaTai Andhare यांनी केली.
आता सरकार कायद्याचा धाक दाखवणार की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
Discussion about this post