आगळंवेगळं गाव! इथे आहे अपक्षाची सत्ता | khemjai Village
[tta_listen_btn]
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील खेमजई हे एक छोटेसे गाव चर्चेत आले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने या गावाची निवड झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. पण, देशभरातील काही गावात या गावाची निवड का झाली? असा प्रश्न पडला. त्याचं उत्तर शोधताना चौकात गेलो. इथे बाकावर काही ज्येष्ठ मंडळी बसली होती. “बाबाजी नमस्कार! आपल्या गावात आज मंत्री येत आहेत का? होय, आमच्या गावात विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त कार्यक्रम असल्याचे एकाने सांगितले. बरं, तुमच्याच गावाची निवड का झाली? मी प्रश्न केला. अजी आमचं गाव एकीचा आहे. लोकसहभाग आहे. लोक एकत्रित येऊन गावाचा विकास करतात. ग्राम पंचायत बिनविरोध झाली. आमच्या गावात कोणताही राजकीय पक्ष नाही, असे ज्येष्ठ मंडळी सांगत होते.
हे गाव आपल्या आदर्श ग्रामपंचायतीसाठी ओळखले जाते. 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत येथे बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत एकही उमेदवार उभा राहिला नाही. सरपंचपदी मनीषा चौधरी यांची निवड झाली. त्या बारावी शिकल्या आहेत. त्याचं माहेर चिमुरजवळच्या पिंपळनेरी येथील. गावात मंत्री महोदयांचे स्वागत करण्यासाठी तयारीच्या लगबगीत होत्या. काय काय व्यवस्था झाली, त्या बारकाईनं बघत होत्या. सोबत त्यांचे ग्रामपंचायत सहकारी मदत करीत होते. उपसरपंच चंद्रहास मोरे यांची भेट झाली. ते उच्च शिक्षित असून त्यांनी 15 वर्षे शिक्षण म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी नोकरी सोडून ग्राम विकासात पूर्ण वेळ देत आहेत.
खेमजई हे गाव प्रसिद्ध हेमांडपंथी शिव मंदिर असलेल्या भटाळी गावाजवळ आहे. येथे जाण्यासाठी वरोरा- नागपूर मार्गावरील टेमुरडा गावातून वळण घेता येते. खेमजई गावात असणारी गोंड राज्यकालीन पायऱ्यांची विहीर प्रसिद्ध आहे. भटाळी येथे दर्शनासाठी येणारे भक्त इथे येत असतात. गावाची एकूण लोकसंख्या 1581 इतकी आहे. गावात जिल्हा परिषद शाळा आहे. एकूण घरांची 389 संख्या असलेल्या या गावात स्त्री लोकसंख्या 48.6 % म्हणजेच 769 इतकी आहे. गावात 1102 लोक शिक्षित आहेत. मात्र, महिला साक्षरता दर 30.2 % (477) कमी आहे.
या गावात कोणताही राजकीय पक्ष नाही. गावातील लोकांचे राजकीय पक्षांपासून दूर राहण्याचे धोरण आहे. ते सर्व एकत्रितपणे गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खेमजई गावातील बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीचे एक उदाहरण आहे. यामुळे लोकशाहीला बळ मिळाले आहे. खेमजई गावाच्या आदर्श कामगिरीमुळे इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. या गावातून इतर गावांसाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आहेत. खेमजई गावाच्या या आदर्श कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असते. लोकसहभागातून अनेक कामे केली जातात. दोन वर्षाआधी बाबा कर्तबशाह टेकडी पर्यंत जाण्यासाठी 2 किमी रस्ता श्रमदानातून करण्यात आला. या रस्त्यामुळे गावकऱ्यांना टेकडीवर जाणे अधिक सोपे झाले आहे. खेमजई गावातील लोक श्रमदानातून अनेक कामे करत आहेत. यामुळे त्यांना गावाचा विकास करण्यासाठी कमी खर्च येतो.
खेमजई गावातील लोकांचे एकत्रितपणे काम करण्याचे ध्येय आहे. ते सर्व एकत्रितपणे गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गावात उमेद आणि माविम यांचे स्वयं सहायता बचत गट आहेत. आधुनिक पद्धतीने शेती व्हावी, यासाठी खेमजई येथे जवस-सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले होते. मजूर कामगारांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी या गावात मनरेगाच्या कामगारांसाठी ड्रेस कोड सुरू करण्यात आला आहे. यामुळे कामगारांना त्यांच्या कामावर अधिक जबाबदारीने काम करण्यास मदत होते. गावात पशू वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे गावातील पशुपालकांना त्यांच्या पशुंच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे झाले आहे.
खेमजई गावाच्या आदर्श कामगिरीमुळे इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. या गावातून इतर गावांसाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आहेत. खेमजई गावाच्या या आदर्श कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
– देवनाथ गंडाटे
Discussion about this post