विदर्भातील शेतकऱ्यांना आधुनिकतेकडे वळावे लागेल
[tta_listen_btn]
विदर्भातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच आधुनिकतेची कास धरण्याची गरज आहे. रिस्क घेऊन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करावी. तेव्हाच शेतीत मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल. विदर्भातील शेतकऱ्यांनी हाक द्यावी, जैन इरिगेशनचे त्यांना साथ देईल, असे आवाहन जैन इरिगेशनचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी केले.
विदर्भातील बुलढाणा, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातील पत्रकारांनी जैन प्रकल्पामध्ये भेट देऊन त्यांनी केलेले फळ संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि रोपवाटिकेची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत जैन इरिगेशनचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी संवाद साधला. त्यांनी सांगितले की जैन हिलची निर्मिती पाणी, आधुनिक शेती आणि ग्रामीण विकास करण्याच्या सोबतच शेतकऱ्यांना मॉडेल दाखवण्यासाठी झाली आहे. शेती हायटेक करणे, प्रशिक्षण देणे, नव्या शेतीची ओळख निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीतून उत्पादन वाढ कसे करता येईल. मर्यादित पाण्यामध्येही शेती कशी वाढवता येईल सर्व प्रकारची उपलब्धता, शास्त्रक्तो शेती करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, याचे संशोधन देखील या प्रकल्पामध्ये केले जाते.
पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजित जैन म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या शेती उत्पन्नाचा विचार केला असता नागपूर विभागामध्ये एकरी दहा ते वीस हजार रुपयांचे उत्पादन होते, तर तेच अमरावती विभागात चाळीस हजार पर्यंत पोहोचते. जळगाव भागामध्ये ७० ते १ लाख रुपयापर्यंत उत्पन्न असते आणि नाशिक आणि पुढे एक लाख दोन लाखापर्यंत एकरी उत्पन्न घेतात. महाराष्ट्र एकच असताना देखील ही तफावत आहे. पावसाचे पर्जन्यमान कमी जास्त आहे. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाणी असूनही उत्पन्न कमी होते. पारंपारिक शेती सोडून नव्या शेतीकडे शेतकरी वळत नाही आणि रीक्स घेऊन आधुनिकतेकडे वळणार नाही, तोपर्यंत शेतीचा विकास होणार नाही. आहे त्यातच समाधान मानत असल्याने बदल होताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकरी मागे पडताना दिसतो.
शिवाय रत्नागिरीचा हापूस, नाशिकची द्राक्ष आणि जळगावची केळी देखील सर्वांनी प्रगती केल्याचे दिसून येते. मराठवाड्यात ऊस उत्पादक शेतकरी वाढला. साखर उत्पन्नमध्ये वाढ झाली आहे. मात्र, विदर्भामध्ये संत्रा हा पूर्वीपासून असतानाही पुढे जाताना आणि संत्रा शेतकऱ्यांची प्रगती होताना दिसत नाही.
विदर्भातील संत्रा उत्पादकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी नागपूरच्या संत्र्यावर संशोधनाचे काम सुरू आहे. पुढील वर्षी संत्र्याची रोपे जैन इरिगेशनच्या माध्यमातून देण्यात येतील. मोर्शी येथे जैन स्वीट ऑरेंज प्रकल्प उभा करण्यात आला आहे. आपल्या भागातील संत्र्याच्या जातीतून ज्यूस कमी निघतो, म्हणून ज्यूस कंपन्यांना उत्पादन घेणे परवडत नाही. त्यामुळे नवीन लागवड पद्धत आणि रोपांची गुणवत्ता बदलली पाहिजे. संत्र्याच्या प्रजातीत सुधारणा करून जास्तीत जास्त कसा निर्माण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
Discussion about this post