News34
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कोडशी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले आणि वणी जैन ले-आऊटमध्ये रहिवासी असलेले शिक्षक अजय लटारी विधाते मागील दोन दिवसापासून घरी पोहचलेच नाही.
यासंदर्भात कुटुंबीयांनी वणी पोलिसात तक्रार दिली असून कुटुंबीयांसह पोलिसांनी शोध सुरु केला आहे. शिक्षक अजय विधाते हे बुधवार १९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता फेरफटका मारून येते असे सांगून घरून दुचाकीने निघाले. रात्र होऊनही ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली.
चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागले मोठे घबाड
गुरुवारीही सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. मात्र त्यांचा शोध लागलाच नाही. दरम्यान, पाटाळा परिसरात त्यांची दुचाकी आढळल्याने एनडीआरएफच्या पथकाना पाचारण करण्यात आले. वर्धा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफ शोध घेत आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांसह कुटुंबीयांना कळविण्याची विनंती करण्यात आली आहे.
Discussion about this post