News34
चंद्रपूर – शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ.उमेश अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 11 जुलै रोजी घडली आहे.
चंद्रपुरात नेत्ररोग तज्ञ डॉ. अग्रवाल यांची आत्महत्या
शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचा साई आय क्लिनिक आहे,11 जुलै च्या रात्री 8 ते 8.30 दरम्यान क्लिनिक मधील रेस्टरूम मध्ये डॉ.अग्रवाल यांनी हेवी डोज चे इंजेक्शन घेतले होते.
डॉक्टरने इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉ. उमेश अग्रवाल यांची पत्नी सुद्धा डॉक्टर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच IMA चे पदाधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दुचाकी चोरली आणि जंगलात लपवली, चोराचा कारनामा
त्यांनी आत्महत्या का केली याबाबत चंद्रपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर हे काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती व चर्चा आहे, मानसिक तणाव कश्याबाबत होता, या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Discussion about this post