‘लाडका भाऊ योजने’साठी कसा कराल अर्ज? पाहा संपूर्ण प्रक्रिया
राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकतीच जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवा.
काय आहे योजना : जिल्हयातील युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठया संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
लाडका भाऊ योजना साठी पात्रता काय ?
- लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
- शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
- या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे आणि वैशिष्ट्ये
- लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केले जाणार.
- या योजनेंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा १० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे .
- प्रशिक्षणादरम्यान, राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, आयटीआयला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे.
- ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
- तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला ६ महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल.
- महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
- राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
- लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल.
- या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल.
- मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील.
येथे करा संपर्क : या करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या http://www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उमेदवारांनी व आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेणे व कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना फक्त एकच वेळेस या योजनेचा लाभ घेता येईल.
जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे.
ladka bhau yojana : माझी लाडकी बहिन योजना की तर्ज पर महाराष्ट्र की शिंदे सरकार ने युवाओं के लिए लडका भाऊ योजना शुरू करने का ऐलान किया है। इस योजना के तहत राज्य के ग्रेजुएट युवा को 10 हजार रुपए प्रतिमाह प्रदान किए जाएंगे। 12वीं पास युवाओं को 6,000 रुपए, आईटीआई को 8,000 रुपए दिए जाएंगे।
Discussion about this post