News34
यवतमाळ : “घरची सगळी कामं उरकून सकाळी साडेआठ वाजता कामाच्या ठिकाणी पोहचतात. कधी लसीकरणाची ड्युटी असते, तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची. घर आणि कामाचं ठिकाण 3-4 किलोमीटरचं अंतर असते. परंतु त्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. आशा वर्कर आरोग्य विभाग व जनतेतील दुवा असून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
चंद्रपुरातील कोतवालाने मागितली 2 हजार रुपयांची लाच
मारेगाव येथील वसंत जिनिंग सभागृह येथे माजी जिल्हा परिषद सभापती अरुणाताई खंडाळकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आशा वर्कर भगिनींचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे, जेष्ठ नेते संजय देरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, काँग्रेस नेते प्रमोद वासेकर, झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष कुलसंगे, अशोक धोबे, गजानन खापणे, रवी धानोरकर, घनश्याम पावडे, शारदा गौरकार, प्रा. राठोड, कल्पना मंगरूळकर, यश मांडवकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्या आशा ताई पार पडत असतात.
कोरोना साथीत घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना काही त्रास आहे का? वयोवृद्ध लोकं कोणत्या घरात राहतात, त्यांना कोणते आजार आहेत का? याचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, होम क्वारंटाईन असलेला कोरोना रूग्णाला कोणती लक्षणं दिसतायेत याबाबत दररोज माहिती घेणं, आरोग्य केंद्रावर लोकांना तपासणीसाठी आणणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, लसीकरण केंद्रांवर मदतीचे काम करणे ही कामं आशा ताई कुठलीही तक्रार न करता काम करीत असतात. परंतु त्यांचे अल्प मानधन व अन्य मागण्या अद्यापही शासन दरबारी लालफितीत अडकून आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post