Unity Run organized on Friday at Navegaon Bandh
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३०.गोंदिया पोलीस विभागाच्या पोलीस ठाणे नवेगावबांधच्या वतीने उद्या दि.३१ ऑक्टोबर रोज शुक्रवारला भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सकाळी ६.०० वाजता एकता दौड आयोजित करण्यात आली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते,हे येथे उल्लेखनीय आहे.
येथील पोलीस ठाण्यातून सकाळी ६.०० वाजता एकता दौड प्रारंभ होऊन,येथील टी पॉइंट चौकातून परत पोलीस ठाण्यात समारोप होईल.
या एकता दौड मध्ये नवेगावबांध पोलीस ठाणा हद्दीतील सर्व गावातील सर्व महिला-पुरुष,युवक-युवती,आबाल, वृद्धांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.
असे आवाहन येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगिता चाफले यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.












Discussion about this post