News34
चंद्रपूर/चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेला चिमूर तालुक्यातील डोमा येथील मुक्ताई धबधबा पर्यटकाविना वाहत आहे, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 31 जुलै पर्यंत हा धबधबा बंद करण्यात आला आहे. Tourists news
दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक मुक्ताई धबधब्यावर निसर्गाचा आनंद लुटतात मात्र यंदा पर्यटकांना याठिकाणी येण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण काही दिवसांपूर्वी मुक्ताई धबधब्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर 60 वर्षीय डोमळू सोनवणे हे शेतात पिकाची पाहणी व जनावरे चारण्यासाठी गेला होता, मात्र तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता दुसऱ्या दिवशी सोनवणे यांचा मृतदेह मिळाला.
या परिसरात अजूनही त्या नरभक्षक वाघाचा वावर असण्याची शक्यता आहे, सध्या या परिसरात वनविभागाने 8 कॅमेरे लावले असून त्या वाघाचा शोध सुरू आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी दिली आहे. चिमूर तालुक्यात पुन्हा वाघाने केले एकाला ठार
मागील 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य स्थिती निर्माण झाली असून मुक्ताई धबधबा पर्यटक विना ओसंडून वाहत आहे, धबधब्या कडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस व वनविभागाचा बंदोबस्त असल्याने पर्यटकांना 31 जुलै पर्यंत नो एन्ट्री आहे. चंद्रपुरात पावसाचा जोर वाढणार
पावसाळ्यात पर्यटनस्थळी जाताना नागरिकांनी आपली काळजी स्वतः घ्यायची आहे, पाण्याचा अंदाज माहीत नसल्याने आपण पाण्यात उतरू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी नागरिकांना केले आहे.
Discussion about this post