काळजी घेत मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी सहकार्य करावे.
-सहायक उपवनसंरक्षक अविनाश मेश्राम यांचे आवाहन.
संजीव बडोले प्रतिनिधी/ नवेगावबांध दि.१२. गेल्या काही दिवसांपासून आपल्या परिसरातील गावाच्या आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.मानवी वस्तीजवळ बिबट्या वारंवार दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.संभाव्य मानवी-बिबट संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी शांतता राखून अफवांवर विश्वास ठेवू नये.बिबट्या हा राष्ट्रीय जीव संपत्तीचा भाग आहे.त्याला जखमी करणे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घेत सजगता व दक्षता बाळगून मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक उपवनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांनी केले आहे.
ते पहाडी वाली माता देवस्थान कोहलगावच्या वतीने नुकतेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी पाहुणे म्हणून चिचगड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर, पत्रकार रामदास बोरकर,संजीव बडोले, विजय डोये,वनपरिक्षेत्र अधिकारी ठोंबरे,पुरी कोळगाव ग्रामपंचायत चे सरपंच बळीराम टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य शरद शहारे गुरुदेव चांदेवार हरिभाऊ नैताम,प्रेमलाल लांजेवार उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक अविनाश मेश्राम, चिचगड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर,वनपरिक्षेत्राधिकारी ठोंबरे,पुरी,पत्रकार रामदास बोरकर,संजीव बडोले,विजय डोये किशोर तरोणे, देवस्थानचे अध्यक्ष बंटी गुप्ता यांचा यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच बळीराम टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य महेश डोंगरवार,हरिभाऊ नैताम,शरद शहारे,रतीराम कवडो गुरुदेव चांदेवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन किशोर तरोणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बंटी गुप्ता यांनी मानले. गुफा वाली माता देवस्थान कोहलगावचे पदाधिकारी व सदस्य विकास वाढई,राजकुमार प्रधान,रवींद्र वाढई,मोकेश्वर मेश्राम,नकाराम शेंदरे,माधव चचाने,गोपाल नैताम, दयाशंकर कवडो, धनराज लांजेवार,संदीप आलोत,अनिल लांजेवार,अजय मडावी, मनोहर उरकुडे, निखिल कोडवते,तुकाराम कवडो, चोपराम नैताम,सलामे महाराज, मुन्ना चांडक,रामकृष्ण दोनाडकर,कुंडलिक कंगाले,भास्कर राऊत, भोजराज राऊत, विशाल कोडवते,अल्फाज पठाण व समस्त दुर्गा माता मंदिर समिती समितीचे सदस्य यावेळी हजारो भाविकांसह उपस्थित होते.












Discussion about this post