News34 firing news rajura
चंद्रपूर : राजूरा क्षेत्रात कोळसा तस्करी व पूर्व वैमनस्यातून राजुरा शहरातील बलदेवसिंग शेरगिल या कोळसा व्यापाऱ्यांवर दोघांनी गोळीबार केल्याची घटना 23 जुलै ला रात्री 8.30 उघडकीस आली, या गोळीबारात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी 27 वर्षीय पूर्वशा डोहे यांचा नाहक मृत्यू झाला.
यापूर्वी देखील कोळशाच्या वादातून यादव नामक व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. आता काही वर्षांनी अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
राजुरा तालुक्यामध्ये अनेक कोळसा खाणी आहेत या कोळशाची वाहतूक इतरत्र केली जाते तसेच कोळशाची तस्करी करणारे एक रॅकेट देखील येथे सक्रिय आहे त्यामुळे कोळशाच्या तस्करीवरून अनेकदा अनेक गट आमने-सामने येत असतात आणि त्यातूनच त्यांच्या त जीवघेणी स्पर्धा सुरू असते यापूर्वी दोन वर्षांपूर्वी यादव नामक व्यक्तीची याच कोळसा तस्करी वरून हत्या करण्यात आली होती आता या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने कोळसा तस्करी आणि जीवघेणा संघर्ष असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
सहायक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्यावर केला गोळीबार
प्राप्त माहितीनुसार राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्ड मधील भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या शेजारी लल्ली शेरगिल राहतो. काल रात्रीच्या सुमारास बलदेवसिंग उर्फ लल्ली घरून बाहेर पडला होता, त्यावेळी तो शेजारी असलेल्या डोहे यांच्या घराजवळ थांबला असताना पाळत ठेऊन असणाऱ्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.
स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात तो पळत जाऊन डोहे यांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नांत असताना 27 वर्षीय पूर्वशा डोहे या अचानक बाहेर आल्या त्यांना धक्का देत लल्ली घराच्या आत शिरला, त्यावेळी मारेकऱ्यांनी एक फायर केला असता ती गोळी सरळ पूर्वशा यांच्या छातीत घुसली, त्यामुळे पूर्वशा यांचा जागीच मृत्यू झाला.
मारेकऱ्यांनी लल्ली चा पाठलाग करीत गोळीबार केला असता 1 गोळी त्याच्या पाठीत शिरली यामध्ये तो खाली कोसळला, तो मरण पावला असे समजत मारेकऱ्यांनी दुचाकीवरून पळ काढला.
पूर्वशा हिला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर लल्ली या व्यक्तीवर चंद्रपुरात उपचार सुरू असून त्याची स्थिती गंभीर आहे.
मारेकऱ्यांना पकडले
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला.त्यामुळे आरोपींना पकडण्याचा मोठा दबाव पोलीस प्रशासनावर होता त्यानुसार पोलीस प्रशासन तातडीने कामाला लागले आणि मध्यरात्री त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये आरोपी 19 वर्षीय लबज्योत सिंग देवल व अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपिकडून पोलिसांनी देशी पिस्टल सहित 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहे, आरोपीनी एकूण 4 राउंड फायर केले होते, त्यामध्ये 2 राउंड मिस झाले.
पालकमंत्री मुनगंटीवारांनी दिले तातडीचे आदेश
भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू झाल्याने याची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यामध्ये कोणीही अवैधरित्या शस्त्र बाळगल्यास त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहे. सोबतच या घटनेच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देखील मुनगंटीवार यांनी दिले आहे.
हल्ला का झाला?
लबज्योत सिंग यांचा मागील अनेक वर्षांपासून बलदेवसिंग शेरगिल सोबत वाद सुरू होता, काही वर्षांपूर्वी बलदेव यांनी नवज्योत चा भावाला मारहाण केली होती, व लबज्योत कडे शस्त्र असल्याची गोपनीय माहिती बलदेव ने पोलिसांना दिली होती, आपल्या जवळील जमा असलेले शस्त्रे पोलिसांच्या हाती बलदेव मुळे लागले, त्याचा राग नवज्योत च्या मनात होता.
आता बलदेव पासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी आरोपी लबज्योत ने अल्पवयीन सोबत बलदेव ला मारण्याची योजना बनविली, मात्र या गोळीबारात पूर्वशा डोहे यांचा नाहक बळी गेला.
Discussion about this post