News34
चंद्रपूर – जिल्ह्याला 4 दिवस पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिल्यावर जिल्हाधिकारी गौडा यांनी 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय यांना सुट्टी घोषित केली होती, मात्र त्यानंतर सुद्धा बल्लारपूर येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
आता 28 जुलै ला सकाळी 27 जुलै रोजीचा सुट्टीचे पत्र एडिट करीत 28 जुलै रोजी सुद्धा सुट्टी घोषित करण्याचे पत्र सकाळ पासून समाज माध्यमावर व्हायरल होत आहे, यावर आपत्ती व्यवस्थापणातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अतिशय महत्त्वाचे: काही समाज माध्यमांवरून आज दिनांक 28 रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आज 28 जुलै रोजी शाळा महाविद्यालयाच्या सुट्टीबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
– जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर
सदर मॅसेज हा चुकीचा असला तर प्रशासनाने यावर कारवाई करायला हवी जेणेकरून असे संदेश व्हायरल होणार नाही.
Discussion about this post