News34
वरोरा /भद्रावती : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत संपूर्ण आठवडाभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज (दि.३०) ला जनसेवा दिन सप्ताहाच्या चवथ्या दिवशी विधानसभा क्षेत्रातील युवक, युवती विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना जनजागृती पर संदेश देण्यात आला.
शिवसेनेतर्फे भद्रावती व वरोरा दोन्ही तालुक्यात जिल्हाभरातील विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज गेल्या महिनाभरापासून प्रत्येक रविवारला राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचा जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने अमली पदार्थ, ड्रगज, व्यसन, मद्य, गुटखा, खर्रा, आदी नशा आणणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे तथा या पदार्थांना शालेय तसेच महाविद्यालयीन परीसरापासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेची युवासेना युवक व विद्यार्थ्यांना कशी मदत करेल, यावर जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.
जनजागृती मार्गदर्शनात विचार मांडताना, शरीर हे पवित्र आत्म्याचे घर आहे. आई वडीलांनी दिलेले संस्कार व सदविचारांचे ते मंदिर आहे. आयुष्यात यश गाठण्यासाठी सुदृढ व सशक्त शरीर असणे आवश्यक आहे. म्हणून या शरीराला नशा आणणाऱ्या अंमली पदार्थांपासून दूर ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तरुण वयात जोश असतो. मन चंचल असते. नेमके या वयात भरकटण्याचे अनेक मार्ग समोर येतात पण तरुणांनी स्वतःच मनोबल शांत व सशक्त ठेवून स्वतः सोबतच शालेय व महाविद्यालयीन परीसर अंमली पदार्थ मुक्त ठेवावा. यासाठी युवासेना सदैव युवकांच्या सोबत आहे.
सोबतच आज सोशल मीडियाचे युग आहे. मोबाईल वर अनेक फसवे संदेश येतात, आर्थिक, लैंगिक, फसवेगिरी होते, अशा पासून सतर्क राहणे व त्याबाबत ज्ञान वाढविणे आवश्यक आहे. याचे योग्य प्रशिक्षण युवा सेना विद्यार्थ्यांना येत्या काळात शाळा व महाविद्यालयात जावून देईल, म्हणून युवकांनी अंमली पदार्थ व सोशल मीडिया बाबत जागृत राहून सतर्क असावे, असे विचार यावेळी शिवसेना (उबाठा) विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सांगितले.
यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, विधानसभा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, वरोरा शहर संघटीका प्रा. प्रीती पोहाने, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर, संतोष माडेकर, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार, गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.
वरोरा-भद्रावती शिवसेना (उबाठा) तर्फे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
Discussion about this post