News34
गडचांदूर/चंद्रपूर – संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानच्या चंद्रपूर जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली.
समाजाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हितेश चव्हाण, उपाध्यक्ष रामचंद्र पवार तर सचिव उत्तम जाधव यांची निवड करण्यात आली.
25 जुलै ला गडचांदूर येथील सेलिब्रेशन हॉल मध्ये बंजारा समाजाची सभा घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षपदी अन्नाराव आडे हे होते.
सभेत समाजाच्या विकास व समजाईक कार्यात भर देण्याची बाब आडे यांनी आपल्या संबोधनातून उपस्थितांना केली.
सभेत समाजाच्या उन्नतीसाठी विविध ठराव घेण्यात आले.
त्यांनतर समाज संस्थानाला नाव देण्यासाठी तीन पर्याय सुचविण्यात आले ज्यामध्ये क्रांतिकारी सेवालाल गोर बंजारा समाज संस्थान गडचांदूर, संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान व सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज सेवा संस्थान गडचांदूर च्या नावाचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन गणेश राठोड यांनी केले तर प्रास्ताविक व मनोगत विनोद चव्हाण यांनी व्यक्त केले.
आयोजित सभेत संत सेवालाल महाराज गोर बंजारा समाज संस्थान ची नवी कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
संस्थानच्या अध्यक्षपदी हितेश चव्हाण, उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव उत्तम जाधव, सहसचिव अशोक जाधव, कोषाध्यक्ष कनिराम पवार, संस्थानच्या सदस्यपदी माधव पवार, वामन जाधव, कैलास पवार, गणेश करमटोट, संतोष राठोड, देविदास पवार, सुभाष जाधव, दिलीप राठोड, विजय चव्हाण, शिवाजी राठोड, शंकर राठोड व रामसिंग पवार यांची निवड करण्यात आली.
सल्लागार व मार्गदर्शक मंडळात गोविंद पवार, विनायक राठोड, देवराव पवार वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर, पांडुरंग जाधव संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पांडुरंग पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक, एमडी चव्हाण मुख्याध्यापक, मधुकर राठोड व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अण्णाराव आडे,दामोदर राठोड, सुभाष जाधव, रामबाबू पवार मुख्याध्यापक तथा संचालक, सूर्यकांत राठोड, बंडू राठोड संचालक शिक्षक सोसायटी, राठोड अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विनोद चव्हाण, सचिन पवार, संतोष राठोड, उल्हास पवार, सुदर्शन राठोड, वामन चव्हाण, सोपान जाधव, श्रीरंग राठोड, शिवाजी राठोड, विनायक पवार, दिलीप राठोड, नामदेव जाधव, राजेश पवार, गोविंद पवार, देविदास राठोड, रमेश चव्हाण व वामन जाधव यांनी अथक परिश्रम केले.
नवनियुक्त कार्यकारिणीचे समाजबांधवांनी अभिनंदन करीत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
Discussion about this post