News34
चिमूर :- चंद्रपूर शहरात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असली तरी ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे, मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने काही तालुक्यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चिमूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गावांना फटका बसला असून चिमूर तालुक्यातील शंकरपुर जवळील पांजरेपार या गावाला पुराणे वेढल्या मुळे तेथील जनजीवन संपूर्ण विस्कळित झाले आहे.
चंद्रपुरात शिवसेनेची मशाल पेटली
चिमूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यातील गावातील जनजीवन विस्कळित झाले व चिमूर शहराकडे येणारे काही गावातील संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पांजरेपार या गावाला पुराचा तडाखा बसला असून गावातील साठ ते सत्तर घरात पाणी घुसले असल्यामुळे व अनाजाचे नुकसान झाल्यामुळे आज त्यांच्या चुली सुद्धा पेटल्या नाहीत.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर यांनी ताबडतोब जाऊन गावाचा आढावा घेतला. सध्या तरी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी आढावा घेण्याकरिता गावात पोहचले नव्हते. अशी माहिती ग्राम पंचायत सदस्य मुकेश भोयर व गावकऱ्यांनी दिली. गावात नागरिकांच्या अनाजासोबत जनावरांच्या चाराचे अतोनात नुकसान झाले.
नागभीड – नागभीड -नागपूर राष्ट्रीय महामार्गवरील बामणी गावानाजिकच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे.
तळोधी – दोन दिवसापासून चालू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे तळोधी जवडील बोकडोह नाल्या वरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तळोधी आरमोरी मार्ग काही काळ बंद होता तळोधी पोलीस स्टेशन तर्फे कोणीही पुराच्या पाण्यातून वाहत जाऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Discussion about this post