News34 गुरू गुरनुले
मुल – आपल्याच राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातच सर्वात मोठा थर्मल पवार स्टेशन असून या जिल्ह्यातील वीज मुंबई सारख्या मोठ्या शहरात पुरविली जाते आणि आपल्याच जिल्ह्यात नेहमी अंधाराचे साम्राज्य असते.
हा त्रास अनेक वर्षापासून जनता सहन करीत आहे. परत अनेक राज्यात विद्युत दर फार कमी प्रमाणात असल्याने ग्राहकांना अतिशय कमी बिल येते परंतु आपल्याच महाराष्ट्रात भरमसाठ दुपटीने युनिटचे दर वाढविल्याने मुल शहरातील असो वा ग्रामीण भागातील विद्युत ग्राहकांना वाढीव दरानुसार भरमसाठ बिल आल्याने सर्वसामान्य जनतेला व गरीब जनतेला अव्वाच्यासव्वा हजाराच्या वरच बिल दिल्याने विद्युत ग्राहक आर्थिक संकटात सापडला आहे.
याबाबत ग्रामीण व शहरी भागातील जनता तालुका काँग्रेसकडे येऊन आपल्या गाऱ्हाणे मांडले. यावर मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १४ जुलै २०२३ रोजी महावितरण कार्यालयावर अनेक विद्युत ग्राहकांना सोबत घेऊन आंदोलनात्मक भूमिका घेऊन वाढीव विद्युत दर कमी करावे असे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया यांना देण्यात आले.
याप्रसंगी शहर साहाय्यक अभियंता श्री उजवणे उपस्थित होते. या दराची वाढ माहे एप्रिल २०२३ पासून करण्यात आली. ज्या पद्धतीने वाढ करण्यात आली त्याचे दर पूर्वीचे विद्युत आकार ३.३६ ऐवजी ४.४१ केले. ७.३४ चे ९.६४, १०.३७ चे १३.६१केले. ११.८६ चे १५.५७ अशा प्रमाणात वाढविण्यात आल्याने ज्या ग्राहकांना 300 रुपये बिल येत होता तो वाढीव नुसार एकदम 900 रुपये देण्यात आला आहे. अशा तिपटीने वीज बिल वाढल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. करीता वाढीव विद्युत बिल जुन्याच दरानुसार देण्यात यावे अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
ग्राहकांना विद्युत बिल भरण्याच्या तारखेच्या आठ दिवस अगोदर देण्यात यावे
मुल नगरातील व ग्रामीण भागातील विद्युत ग्राहक यांना विद्युत बिल हे भरण्याच्या तारखेच्या फक्त तीन दिवस अगोदर देण्यात येत आहे.तेही शुक्रवारला बिल देतात आणि शनिवार रविवारला बँका व सहकारी सोसायट्या बंद असतात त्यामुळे सोमवार किंवा त्यापुढे ग्राहकांना पैशाचे नियोजन करून बिल भरावे लागते. तेव्हा बिलाची तारीख गेलेली असते म्हणून परत ग्राहकास ५०/- रुपये दंड भरण्याची पाळी येत असते. एकंदरीत विद्युत ग्राहकांवर व जनतेवर महावितरण विभागाची मनमानी असल्याचे निवेदन कर्त्यानी अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना ही बाब लक्षात आणून दिली आहे. हेही मनमानी धोरण त्वरित बंद करावे अशीही मागणी करण्यात आली.
उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार ,माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर,उपसभापती राजेंद्र कन्नमवार ,काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार ,महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, बाजार समिती संचालक व विविध कार्य .सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार,संचालक व सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांग्रेडिवार, संचालक किशोर घडसे, संचालक हसन वाढई, माजी नगरसेवक विनोद कांमडे,ललिता फुलझेले, बाबराळा सरपंच धीरज गोहने, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, काँग्रेस पदाधिकारी संदीप मोहबे, विष्णू सादमवार ,आदित्य पधरे, शामला बेलसरे,सीमा भसांरकर,पापिता टीगुसले, उमा बेलसरे, फर्जना शेख, अमित गोलावार, आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post